• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. while cooking black eyed peas can adding carrots help prevent gas problem read what expert said asp

चवळी शिजवताना गाजर टाकल्याने गॅसपासून बचाव होऊ शकतो का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

Gas Prevention Tips: गाजरमध्ये विरघळणारे फायबर असते, त्यामुळे ते घटक शोषून घेतात, ज्यामुळे गॅस कमी होऊ शकतो.

February 24, 2025 22:40 IST
Follow Us
  • Gas Prevention Tips
    1/9

    थंडीच्या महिन्यांत सूप (hearty soups) आणि चवळी (ब्लॅक-आयड बीन्स) त्यांच्या आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जातात. पण,यांचे सेवन करताना एका समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे पोटफुगी. तर या संदर्भातला उपाय एक उपाय डिजिटल क्रिएटर Ivy Odom Aponte ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. डिजिटल क्रिएटरला हा हॅक तिच्या आईने सांगितला आहे; असे सुद्धा तिने नमूद केले आहे. तिच्या आईनेसांगितले की, चवळी (ब्लॅक-आयड बीन्स) शिजवताना त्यात गाजर टाकल्यास, नंतर त्याचे सेवन करताना पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध घालता येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तर हा उपाय खरोखर काम करेल का? यात काही विज्ञान आहे का? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात की, बहुतेक शेंगांप्रमाणेच, चवळीमध्ये ऑलिगोसॅकराइड्स नावाचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, जे पचायला जड असतात आणि आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियामुळे आंबवले जातात, यामुळे गॅस तयार होतो; त्यामुळे चवळी रात्रभर भिजवून थोडी मऊ झाल्यानंतर शिजवण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांनी सुद्धा सहमती दिली की, oligosaccharides फ्लॅट्युलेंसची समस्या निर्माण करतात, कारण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे हे प्रकार आपल्या शरीरात सहज पचत नाहीत, म्हणून ते मोठ्या आतड्यात पोहचतात जेथे जीवाणू त्यांच्यावर कार्य करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    चवळी शिजवताना गाजर टाकल्याने गॅसपासून बचाव होऊ शकतो का?
    गाजराचा गॅस कमी करण्यावर परिणाम होतो की नाही हे माहिती नसले तरीही होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात की, गाजरमध्ये विरघळणारे फायबर असते, त्यामुळे ते घटक शोषून घेतात, ज्यामुळे गॅस कमी होऊ शकतो. विरघळणारे फायबर आपल्या आतड्यात वायू (गॅस) निर्माण करणाऱ्या कार्बोहायड्रेट्सला अधिक प्रभावीपणे तोडण्यास मदत करून पचन प्रक्रियेत मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    चवळीमध्ये असणारे अघुलनशील फायबर किंवा कॉम्प्लेक्स कर्बोदकांमुळे जीवाणूंचा संपर्क कमी होण्यास किंवा विलंब होण्यास मदत होते. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सवर लहान आतड्यात कार्य केले जाते आणि मोठ्या आतड्यात पचलेल्या कर्बोदकांमधे बॅक्टेरियाचा संपर्क कमी करण्यात मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा म्हणतात की, भारतीय सामान्यत: मसाले आणि हिंगसारखे मसाले जेवणात घालतात, जे पोट फुगणे आणि गॅस किंवा फ्लॅट्युलेंसची समस्या व्यवस्थापित करण्यास मदत करतात. म्हणून चवळीमध्ये शक्यतो गाजर घालण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    चवळीमधील बी जीवनसत्त्वे उर्जा स्त्रोत म्हणून काम करतात. त्याचबरोबर चवळी पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्लायफेनॉलसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांनीदेखील समृद्ध आहे, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात ; असे होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा म्हणतात की, चवळी आणि गाजर दोन्हीमध्ये फायबर असते, जे पाचन आरोग्य, वजन, हृदयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यास मदत करते आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करते. गाजर व्हिटॅमिन एसारखे अँटिऑक्सिडेंट प्रदान करून योगदान देऊ शकते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव यांनी पोटातील गॅस कमी करण्यासाठी (Gas Prevention Tips) चवळीमध्ये जिरे आणि दालचिनीसारखे मसाले किंवा ओवा घालण्याचा सल्ला देतात. चवळी रात्रभर भिजत ठेवा आणि त्यातले पाणी टाकून द्या. पुन्हा ताज्या पाण्याने धुवा. ते मऊ होईपर्यंत उकळवा. चवळी असलेल्या जेवणात दही घाला. कोथिंबीर आणि पुदिना चटणी चवळीबरोबर खा, कारण दोन्ही औषधी वनस्पती पचनास मदत करतात, असा सल्ला त्यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: While cooking black eyed peas can adding carrots help prevent gas problem read what expert said asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.