-
ऑफिसमध्ये काम करताना झोप येणे खूप सामान्य आहे, परंतु झोप आणि आळस यामुळे कामात व्यत्यय येतो. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर जास्त झोप येते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कारण, दुपारनंतर शरीराची ऊर्जा पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा आणि झोप येते. याशिवाय ऑफिसमध्ये झोप येण्यामागे रात्रीची झोप अपूर्ण, थकवा, आरोग्य समस्या ही देखील कारणे असू शकतात.(फोटो सौजन्य: Freepik) -
तुमच्याबरोबरही हे वारंवार घडत असेल तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. ऑफिसमध्ये झोपेमुळे कामावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये झोप टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. दिवसा झोप येण्याच्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्याबरोबरही हे वारंवार घडत असेल तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. ऑफिसमध्ये झोपेमुळे कामावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये झोप टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. दिवसा झोप येण्याच्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सुमारे १०-२० मिनिटांची एक छोटीशी झोप घेतल्यास फ्रेश वाटू शकते. यामुळे आळस दूर होईल, ऊर्जा टिकून राहील आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: Freepik) -
जड जेवण टाळावे. जेवणानंतर उर्जेचा अभाव असू शकतो. त्याऐवजी तुमची ऊर्जा पातळी वाढविण्यासाठी दुपारच्या जेवणात हलके प्रथिने, संपूर्ण धान्य आणि भाज्या खा. तसेच जास्त कार्बोहायड्रेट आणि जड जेवण खाणे टाळा, ज्यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डिहायड्रेशनमुळे थकवा आणि आळस येऊ शकतो. तुमच्या टेबलावर पाण्याची बाटली ठेवा आणि दिवसभर पाणी प्या. डिहायड्रेशन तुमच्या मूड आणि एकाग्रतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे थकवा येतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कॅफिनचे सेवन तुम्हाला त्वरित ऊर्जा देऊ शकते, परंतु ते हुशारीने वापरा. सकाळी किंवा दुपारी थोड्या प्रमाणात कॅफिन घेतल्याने तुम्हाला ऊर्जावान राहण्यास मदत होऊ शकते. परंतु, दिवसा उशिरा कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळा, कारण यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जास्त वेळ एकाच जागी बसल्याने तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. अधूनमधून उभे राहा, थोडे चाला, सहकाऱ्यांशी गप्पा मारा. शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण वाढते आणि तुम्हाला ऊर्जावान राहण्यास मदत होते.
(फोटो सौजन्य: Freepik)
‘या’ पाच उपायांनी ऑफिसमध्ये काम करताना येणारी झोप जाईल पळून
Excessive daytime sleepiness: ऑफिसमध्ये झोप टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. दिवसा झोप येण्याच्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत.
Web Title: Constant sleep while working in the office sap