• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. five amazing benefits of rose tea which are beneficial for your health asp

वजन कमी करण्यापासून ते निरोगी त्वचेपर्यंत… गुलाबाच्या पाकळ्यांचा ‘हे’ फायदे वाचून व्हाल थक्क

Health Benefits Of Rose Tea : गुलाब फक्त दिसायलाच सुंदर नसून त्यांचे अनेक फायदेही तुम्हाला होतात…

March 25, 2025 19:30 IST
Follow Us
  • five health benefits of rose tea
    1/9

    रंगीबेरंगी फुलांमध्ये गुलाब हे फूल अगदी सगळ्यांनाच आवडते. पण, गुलाब हे फक्त दिसायलाच सुंदर नसून त्यांचे अनेक फायदेही तुम्हाला होतात; याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    तर गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर विविध पदार्थ, मिठाई, सरबत बनवण्यासाठी केला जातो. पण, याचबरोबर गुलाब त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    जर तुम्ही चहाप्रेमी आहात आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर ‘गुलाब चहा’ फायदेशीर ठरू शकतो. गुलाब चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. गुलाब चहा तुम्हाला ताजे, तणावमुक्त ठेवण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    तर आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या चहाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    वजन कमी करण्यात मदत
    जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल, तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गुलाब चहा पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुलाब चहामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडेंट असतात, जे पचन सुधारण्यास, चयापचय वाढवण्यास मदत करतात. गुलाब चहाचे सेवन केल्यामुळे चरबी कमी होऊन वजन कमी करण्याससुद्धा मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    त्वचेसाठी फायदेशीर
    गुलाब चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई त्वचेला भरपूर पोषण देतात; ज्यामुळे त्वचा मुलायम आणि तरुण दिसते. त्याचबरोबर गुलाब चहा रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करते आणि डाग कमी करते आणि त्वचा हायड्रेट राहण्याससुद्धा मदत करते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे
    गुलाब चहा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. कारण या चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जी नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला बाहेरील संसर्गापासून वाचवतात आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही आराम देतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    पचनक्रिया सुधारते
    गुलाब चहाचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. या चहामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पचन सुधारण्यास मदत करतात. याच्या सेवनाने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांपासून लगेच आराम मिळतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    तणाव कमी होतो
    अनियमित जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनामुळे बहुतेक लोकांना तणावाची समस्या भेडसावत असते. अशा परिस्थितीत गुलाबाचा चहा तुमचा तणाव कमी करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट तणाव कमी करतात, मूड फ्रेश करतात आणि चांगली झोप घेण्यासही मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Five amazing benefits of rose tea which are beneficial for your health asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.