-
देशाच्या अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यानंतर थंडगार सरबत, ताक किंवा थंड पाणी लोक आवर्जून पितात. त्याशिवाय अनेक जण तर उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रिजवर अवलंबून असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कधी कधी फ्रिजचे पाणी काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते आणि ते आजारीदेखील पडू शकतात. अशा वेळी तुम्ही फ्रिजचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पाणी थंड करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुमच्या घरी फ्रिज नसेल किंवा फ्रिजमधील पाणी तुम्हाला प्यायला आवडत नसेल, तर तुम्ही खालील काही टिप्स फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भारतात अगदी पुरातन काळापासून थंड पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जातो. खरं तर, मातीच्या माठात पाणी ओतल्यानंतर पाण्याचे हळूहळू त्याच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होते, ज्यामुळे ते थंड राहते. (फोटो सौजन्य: Freepik) -
जर तुम्हाला पूर्णपणे थंड पाणी हवे असेल, तर माठ सावलीत ठेवा. त्याशिवाय तुम्ही माठावर ओले कापडदेखील ठेवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik) -
तुम्हाला प्रवासात नैसर्गिक पद्धतीने थंड पाणी हवे असेल, तर तुम्ही बाटलीबंद पाणीदेखील वापरू शकता. त्यासाठी आधी बाटली पाण्याने भरा. आता ही बाटली पाण्यात भिजवलेल्या सुती कापडात गुंडाळा आणि सावलीत ठेवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही ते हवेशीर ठिकाणीदेखील ठेवू शकता. अशा प्रकारे पाणी थोड्याच वेळात पूर्णपणे थंड होईल. ही बाटली तुम्ही प्रवासातही वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तांब्याचा वापर पौराणिक काळापासून केला जात आहे. तुम्ही तांब्याच्या भांड्यातही पाणी साठवू शकता. खरे तर, त्यात पाणी ठेवल्याने ते तापमान नियंत्रित करते, ज्यामुळे पाणी थंड राहते. त्याशिवाय त्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. (फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)
फ्रिजशिवाय नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड कसे करावे?
How To Keep Water Cool In Summer: जर तुमच्या घरी फ्रिज नसेल किंवा फ्रिजमधील पाणी तुम्हाला प्यायला आवडत नसेल, तर तुम्ही खालील काही टिप्स फॉलो करू शकता.
Web Title: How to cool water naturally without a fridge sap