-
ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीने जानेवारी २०२३ मध्ये कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता आणि अडीच वर्ष तो याच राशीमध्ये राहिल्यानंतर शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना समोरे जावे लागेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
परंतु काही राशीच्या व्यक्तींना चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२०२७ पर्यंत ‘या’ तीन राशींची चांदी; मीन राशीतील शनीचा प्रवेश देणार पैसाच पैसा अन् भाग्य चमकवणार
Saturn Transit In Pisces: शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहिल.
Web Title: Shani in meen rashi three zodic get good luck and happiness till 27 sap