-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार एका महिन्यानंतर शुक्र त्याच्या स्वराशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या काळात कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘या’ तीन राशी होणार मालामाल; शुक्राच्या स्वराशातील प्रवेशाने नवी नोकरी अन् अपार धनसंपत्ती मिळणार
Shukra gochar in taurus: पंचांगानुसार एका महिन्यानंतर शुक्र त्याच्या स्वराशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल.
Web Title: Shukra entre in taurus three zodic get material happiness and success sap