-
अश्वगंधा शरीरातील तणाव संप्रेरकांचे प्रमाण नियंत्रित करून मानसिक तणाव, चिंता आणि थकवा कमी करण्यास मदत करते.
-
अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, अश्वगंधा झोपेच्या वेळेत आणि गाढ झोप मिळण्याच्या दृष्टीने सुधारणा करते.
-
अश्वगंधा पेशींमध्ये अॅडेनोसिन ट्रायफॉस्फेटचे उत्पादन वाढवते, जो शरीरातील ऊर्जास्रोत आहे. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराची सहनशक्ती वाढते.
-
अश्वगंधा मेंदूचे संतुलन राखून स्मरणशक्ती, एकाग्रता व मानसिक स्पष्टता वाढवते.
-
अश्वगंधा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध संसर्गांपासून संरक्षण करते. त्यामुळे शरीर अधिक निरोगी राहते
-
अश्वगंधा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. अश्वगंधा रक्तवाहिन्यांचे प्रसरण करून, दाह कमी करून आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करून हृदयाचे आरोग्य सुधारते.
-
अश्वगंधा पचनसंस्थेचे कार्य सुधारून, अन्नाचे योग्य पचन करण्यात मदत करते
-
अश्वगंधा घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करीत असाल किंवा कोणत्याही औषधांचा नियमित वापर करीत असाल, तर अश्वगंधाचे अति प्रमाणात सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : पिंटरेस्ट)
अश्वगंधाचे आरोग्यदायी महत्त्व
Ashwagandha Health Benefits: आयुर्वेदात प्राचीन काळापासून वापरले जाणारे प्रभावी औषध म्हणजे अश्वगंधा. या अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेऊ.
Web Title: Amazing health benefits of ashwagandha natural remedy for stress sleep energy immunity pyd 04