-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. मे महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यात सर्वात आधी तो ७ मे रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि २३ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या एकाच महिन्यातील दोन वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे मे महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुध ग्रहाचे दोन वेळा होणारे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘या’ तीन राशींची होणार चांदी; बुधाचे राशी परिवर्तन देणार करिअर, कीर्ती अन् अचानक धनलाभ
Budh Gochar In May: ७ मे रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि २३ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल.
Web Title: Budh gochar 25 these three zodic get increase bank balance and happiness sap