• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why the ambani family lives on the 27th floor of antilia nita ambani reveals the reason jshd import rak

अंबानी कुटुंब अँटिलियाच्या २७ व्या मजल्यावरच का राहते? नीता अंबानींनी सांगितले कारण

अंबानी कुटुंब राहते त्या मुंबईतीलअँटिलिया या बहुमजली इमारत एकूण २७ मजले आहेत, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अंबानी कुटुंबाने इतक्या मोठ्या इमारतीतील सर्वात वरचा मजला म्हणजेच २७ वा मजला राहण्यासाठी निवडला आहे.

April 25, 2025 23:21 IST
Follow Us
  • Antilia 27th floor
    1/7

    Why Ambani family lives on 27th floor: मुंबईतील आलिशान गगनचुंबी इमारत ‘अँटिलिया’ कोण ओळखत नाही? ही भव्य इमारत केवळ तिची रचना आणि भव्यतेमुळेच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी एक अंबानी कुटुंबाचे ते निवासस्थान असल्याने देखील चर्चेत असते. (छायाचित्र स्रोत: एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 2/7

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ४,००,००० चौरस फूट आणि ५७० फूट उंचीच्या या इमारतीत अंबानी कुटुंबाने राहण्यासाठी २७ वा मजला का निवडला? या प्रश्नाचे उत्तर स्वतः नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत दिले आहे. (छायाचित्र स्रोत: एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 3/7

    टाईम्स नाऊशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, त्यांनी राहण्यासाठी २७ वा मजला निवडला कारण तेथे भरपूर सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि मुंबईच्या गर्दीपासून दूर असं शांत वातावरण मिळतं. (छायाचित्र स्रोत: एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 4/7

    “हे सर्व नैसर्गिक प्रकाश, ताजी हवा आणि मुंबईच्या गजबजाटापासून दूर शांततेकरिता आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “उंचीवर राहिल्याने थंड वारा, अरबी समुद्राचे सुंदर दृश्ये आणि एक विशेष शांतता मिळते, जी जमिनीच्या जवळ शक्य नसते.” (Photo Source: Abu Jani Sandeep Khosla)

  • 5/7

    नीता अंबानी यांनी असेही सांगितले की, या खास मजल्यावर फक्त काही जवळच्या लोकांनाच येण्याची परवानगी आहे. त्या म्हणाल्या की हा मजला एक प्रकारचा ‘कोकून बबल’ असून येथे कुटुंब एकत्र शांततेत वेळ घालवते. (छायाचित्र स्रोत: एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 6/7

    उंचावर राहणे आरोग्यासाठी चांगले आहे का?
    अँटिलियासारख्या उंच इमारतीत राहिल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? या प्रश्नावर आरोग्य तज्ञांचे मत जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी कंसल्टंट डॉ. मनोज पवार म्हणतात की, “३० व्या मजल्यावरील उंचीवर, ऑक्सिजन आणि हवेची गुणवत्ता बदलू शकते. यामुळे विशेषतः रात्री उच्च रक्तदाब, जलद हृदयाचे ठोके आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.” (छायाचित्र स्रोत: एक्सप्रेस आर्काइव्ह)

  • 7/7

    तसेच मुंबईतील वोकहार्ट हॉस्पिटलमधील चेस्ट फिजिशियन आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधाणी म्हणतात की, “८,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर राहणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, आधुनिक उंच इमारतींमध्ये व्हेंटिलेशन प्रणाली इतक्या प्रगत आहेत की त्या ऑक्सिजन आणि हवेची गुणवत्ता संतुलित ठेवतात.” (Photo Source: Swadesh/Instagram)

TOPICS
नीता अंबानीNita Ambaniमराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Why the ambani family lives on the 27th floor of antilia nita ambani reveals the reason jshd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.