• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 8 indian lentils are secret weapons for muscle metabolism and immunity jshd import ndj

High-protein Dals for weight loss : वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात या डाळींचा समावेश करा, प्रोटिन्सची कमतरताही होईल दूर

Best Dals for weight loss : शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटिन्स खूप महत्वाचे आहेत आणि भारतीय स्वयंपाकघरात डाळी या त्याचे एक उत्कृष्ट स्रोत आहेत. डाळी केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसून त्या सहज पचण्याजोग्या, चविष्ट आणि स्वस्त सुद्धा असतात.

May 13, 2025 16:22 IST
Follow Us
  • Best pulses for vegetarians
    1/9

    शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटिन्स खूप महत्वाचे आहेत आणि भारतीय स्वयंपाकघरात डाळी या त्याचे एक उत्कृष्ट स्रोत आहेत. डाळी केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसून त्या सहज पचण्याजोग्या, चविष्ट आणि स्वस्त सुद्धा असतात. चला जाणून घेऊ या ८ प्रमुख भारतीय डाळींबद्दल जे प्रोटिन्सचा खजिना आहेत आणि आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करायला पाहिजे –
    (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

    चवळीची डाळ
    या डाळीमध्ये जस्त, लोह आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतात.चवळीची डाळ हे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी एक पौष्टिक सुपरफूड आहे. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 3/9

    हिरवी मूग डाळ
    कॅलरीज कमी पण प्रोटिन्स आणि कॅल्शियम जास्त असलेली ही डाळ मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. ही त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 4/9

    लाल मसूर
    ही एक सहज पचणारी डाळ आहे जी अॅसिड आणि गॅस सारख्या समस्यांमध्ये आराम देते. त्यात लोह आणि पोटॅशियम असते, जे रक्ताभिसरण सुधारते. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 5/9

    तूर डाळ
    तूर डाळ ही भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरणारी डाळ आहे. प्रोटिनबरोबर ते चयापचय सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत होते. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 6/9

    हरभरा
    यामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. ही डाळ महिलांसाठी विशेषतः फायदेशीर मानली जाते. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 7/9

    चणा डाळ
    बेसन डाळीमध्ये तांबे आणि मॅंगनीज सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे स्नायूंना बळकटी देते आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 8/9

    उडीद डाळ
    व्हिटॅमिन बी आणि प्रोटिन्स समृद्ध असलेली उडीद डाळ शरीराला ऊर्जा प्रदान करते. हे हाडे मजबूत करते आणि स्नायूंच्या विकासास मदत करते. त्याच्या पचनक्रियेला चालना देण्यासाठी ते रात्रभर भिजवून ठेवावे आणि नंतर शिजवावे. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 9/9

    मूग डाळ
    १०० ग्रॅम मूग डाळीमध्ये सुमारे २४ ग्रॅम प्रोटिन्स असतात. हे कमी-कॅलरीज, लोहाने समृद्ध आणि वजन कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. मूग डाळ शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते आणि पचनासाठी उत्कृष्ट मानली जाते. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

TOPICS
हेल्थHealth

Web Title: These 8 indian lentils are secret weapons for muscle metabolism and immunity jshd import ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.