-
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन करण्यासाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ३० ऑक्टोबर २०२३ पासून राहू मीन राशीत असून केतू ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच येत्या १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ सिद्ध होईल. या काळात अनेक आनंदी वार्ता तुमच्या कानी पडतील. भाग्याची साथ मिळेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे ते करता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू-केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आजपासून राहू-केतू देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना पदोपदी यश मिळणार
Rahu-ketu transit 2025: १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
Web Title: Rahu ketu gochar 25 these three zodic get more money sap