-
जर तुम्ही कमी बजेटमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतात अशी अनेक सुंदर आणि बजेट-फ्रेंडली पर्यटन स्थळे व हिल स्टेशन्स आहेत जिथे तुम्ही एका अद्भुत प्रवासाचा आनंद घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला भारतातील अशा १० परवडणाऱ्या (बजेट फ्रेंडली) पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या ठिकाणी प्रवास करणे तुमच्या खिशाला परवडणारं असेल. (छायाचित्र : पेक्सेल्स)
-
अमृतसर
पंजाबमधील अमृतसर हे सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बाग या दोन ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लंगर मोफत आहेत आणि अमृतसरी कुलचासारखे स्ट्रीट फूड देखील इथे स्वस्त दरात उपलब्ध आहेत जे खूप चविष्ट असतात. त्यामुळे इथे राहणं, खाणं आणि फिरणं खर्चिक नाही. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
कसोल
हिमाचल प्रदेशातील कसोल हे एक शांत आणि सुंदर हिल स्टेशन आहे. दिल्लीहून व्होल्वो बसने येथे सहज पोहोचता येते. येथील बजेट हॉटेल्स आणि परवडणारे कॅफे हे बॅकपॅकर्ससाठी परफेक्ट आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
लॅन्सडाउन
उत्तराखंडमधील हे हिल स्टेशन तिथले शांत वातावरण आणि थंड हवामानासाठी ओळखले जाते. येथे गर्दी कमी आहे आणि राहण्यासाठी बजेट फ्रेंडली होमस्टे आणि हॉटेल्स सहज उपलब्ध आहेत. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
मॅमॅक्लॉडगंज
धरमशालाजवळ मॅक्लॉडगंज हे निसर्ग प्रेमी आणि ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण आहे. येथे स्वस्त हॉटेल्स, मोमोज आणि तिबेटी जेवणाचा आस्वाद घेता येतो. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
ऊटी
तामिळनाडूमधील हे हिल स्टेशन तिथल्या तलावांसाठी, चहाच्या बागांसाठी आणि चर्चसाठी ओळखले जाते. तुम्ही बस किंवा ट्रेनने येथे सहज पोहोचू शकता आणि येथील परवडणाऱ्या हॉटेल्समध्ये राहू शकता. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
हंपी
कर्नाटकातील हंपी हे प्राचीन मंदिरांसाठी व बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. येथे कमी बजेटमध्ये प्रवास करणे सोपे आहे आणि बॅकपॅकर्ससाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
पुष्कर
राजस्थानमधील पुष्कर हे ब्रह्मा मंदिर आणि वार्षिक उंट मेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील कॅफे, घाट आणि गेस्ट हाऊस प्रवाशांच्या बजेटमध्ये बसतात. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
ऋषिकेश
उत्तराखंडमध्ये असलेले ऋषिकेश हे अॅडव्हेंचर आणि शांततेसाठी लोकप्रिय आहे. येथे योग आश्रम, नदीकाठी कॅम्पिंग आणि परवडणाऱ्या दरात गेस्टहाऊस सहज उपलब्ध आहेत. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
तवांग
तवांग हे एक शांत आणि सुंदर हिल स्टेशन आहे, जे तिथल्या मठांसाठी आणि पर्वतीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीहून ट्रेनने येथे पोहोचता येते आणि राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स उपलब्ध आहेत. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
वाराणसी
गंगा घाट, काशी विश्वनाथ मंदिर आणि सांस्कृतिक वारशाने नटलेले वाराणसी हे पर्यटकांसाठी आध्यात्मिक आणि परवडणाऱ्या अशा दोन्ही ठिकाणांचा अनुभव घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. येथे स्ट्रीट फूड आणि धर्मशाळा परवडणाऱ्या किमतीत मिळतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
Photos | फिरायला जायचंय पण पैसे कमी आहेत? मग भारतातील ‘ही’ टॉप १० बजेट फ्रेंडली पर्यटन स्थळं एकदा पाहाच!
भारतात अशी अनेक सुंदर आणि बजेट-फ्रेंडली पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही एका अद्भुत प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
Web Title: Top 10 tourist places in india for budget travellers jshd import asc