• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how sunglasses helps to protect your eyes or what are the benefits of wearing sunglasses asp

सनग्लासेस विकत घेताय? मग ‘या’ गोष्टी नक्की करा चेक ; फॅशनसह डोळ्यांनाही होईल फायदा

How Sunglasses Helps To Protect Your Eyes, : एखाद्या पिकनिकला जाताना, उन्हाळ्यात घराबाहेर पडताना किंवा बाईकवरून प्रवास करताना आपण सगळेच सनग्लासेस (की गॉगल) वापरतो.

May 29, 2025 17:32 IST
Follow Us
  • How do sunglasses protect your eyes
    1/10

    एखाद्या पिकनिकला जाताना, उन्हाळ्यात घराबाहेर पडताना किंवा बाईकवरून प्रवास करताना आपण सगळेच सनग्लासेस (की गॉगल) वापरतो. तुमच्या चेहऱ्याची आणि संपूर्ण ड्रेसिंग स्टाईलची शोभा वाढवण्यासाठी सनग्लासेसना अनेकदा स्टायलिश ॲक्सेसरी म्हणून पाहिले जाते. पण, फक्त फॅशन म्हणून नाही तर त्याच्या पलीकडे सनग्लासेस घालण्याचेसुद्धा अनेक फायदे आहेत. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 2/10

    सनग्लासेस डोळ्यांचे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात; ज्यामुळे मोतीबिंदू, मॅक्युलर डीजनरेशन आणि अगदी पापण्यांचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. चांगल्या दर्जाचे सनग्लासेस ९९% ते १००% UVA आणि UVB किरणांना रोखण्यास मदत करतात, सौर किरणोत्सर्गापासून संरक्षण म्हणून काम करतात. UVA हे किरण त्वचेच्या खोलवर पोहोचतात आणि कोलेजनचे नुकसान करतात; तर UVB किरणामुळे त्वचा जळते आणि टॅनिंग होऊ शकते. सनग्लासेस तुमच्या डोळ्यांचे संरक्षण कसे करतात आणि योग्य सनग्लासेस कसे निवडायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 3/10

    तर योग्य सनग्लासेस कसे निवडायचे?
    १००% UV संरक्षण युक्त सनग्लासेस – नेहमीच १००% यूव्हीए आणि यूव्हीबी संरक्षण देणारे सनग्लासेस निवडा, यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 4/10

    लेन्सची गुणवत्ता, मटेरियल नीट बघा – स्क्रॅच-रेझिस्टंट आणि ऑप्टिकली करेक्ट लेन्स निवडा. पॉली कार्बोनेट किंवा ग्लाससारखे उच्च दर्जाचे मटेरियल चांगले टिकाऊपणा आणि स्पष्टता प्रदान करतात. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 5/10

    पोलोराइज लेन्स – जर तुम्ही बराच वेळ बाहेर असाल तर गाडी चालवताना पोलोराइज लेन्स वापरल्याने डोळ्यासमोर येणारी चमक कमी करून आराम आणि सुरक्षितता प्रदान करतात. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 6/10

    लेबल्स तपासा – सनग्लासेसची सुरक्षितता आणि गुणवत्ता याची हमी देणारे ANSI (अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट) किंवा CE (युरोपियन कॉन्फॉर्मिटी) सारखे लेबल्स सनग्लासेसवर आहे का हेसुद्धा तपासून घ्या. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 7/10

    योग्यरित्या बसणारी फ्रेम निवडा – सनग्लासेस तुमच्या नाकावर आणि कानांभोवती आरामात बसले पाहिजेत. योग्य फिटिंग नसलेले सनग्लासेस खाली सरकू शकतात, अस्वस्थता निर्माण करू शकतात आणि सूर्यप्रकाशापासून कमी संरक्षण देऊ शकतात. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 8/10

    सनग्लासेस तुमच्या डोळ्यांचे संरक्षण कसे करतात?
    हानिकारक किरणांपासून संरक्षण : चांगले सनग्लासेस UVA आणि UVB किरणांपासून १००% संरक्षण देतात. प्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने मोतीबिंदू, मॅक्युलर डीजनरेशन आणि अगदी डोळ्यांचा कर्करोगदेखील होऊ शकतो. पण, सनग्लासेस अडथळा म्हणून काम करतात, ज्यामुळे डोळ्यांच्या या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 9/10

    फोटोकेरायटिस (डोळ्यांना उन्हात जळजळ) होण्यास प्रतिबंध : उन्हात त्वचेप्रमाणेच तुमच्या डोळ्यांचीदेखील जळजळ होऊ शकते. या स्थितीला फोटोकेरायटिस म्हणतात. फोटोकेरायटिसमध्ये वेदना, लालसरपणा आणि तात्पुरती दृष्टी कमी होणे आदी लक्षणांचा समावेश असतो. सनग्लासेस तुमच्या कॉर्नियाला तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास मदत करतात, विशेषतः जेव्हा तुम्ही बर्फ किंवा पाण्यासारख्या पृष्ठभागांजवळ असतात. (फोटो सौजन्य:Pixabay )

  • 10/10

    वारा, धूळ आणि कचऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण : सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त सनग्लासेस धूळ, वाळू आणि वारा यांसारख्या पर्यावरणीय त्रासदायक घटकांविरुद्ध भौतिक अडथळा म्हणून काम करतात. यामुळे कोरडे डोळे, संसर्ग आणि कॉर्नियल ओरखडे टाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य:Pixabay )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How sunglasses helps to protect your eyes or what are the benefits of wearing sunglasses asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.