-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनी देव करतात.
-
ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, शनिने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला. २०२७ पर्यंत शनि येथेच राहील.
-
आता पुढील महिन्यात १३ जुलै रोजी शनी मीन राशीत शनी वक्री होणार आहे. या दरम्यान जुलैपासून तब्बल १३९ दिवस शनी वक्री होणार आहेत. शनीच्या वक्री गतीमुळे पुढील १३९ दिवस काही राशींवर शनिदेवाची कृपा असणार आहे.
-
शनीच्या या उलट्या चालीनं काही राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…
-
शनीची वक्री चाल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. कारण शनी या राशीच्या नोकरी आणि करिअरच्या ठिकाणी वक्री होतील. त्यामुळे, या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकते. तसेच, व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो.
-
शनीदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. याकाळात आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते ज्यामुळे तुमची अनेक अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरदार मंडळींना आयुष्यात नव्या संधी मिळवून देणारी एखादी घटना अनुभवता येऊ शकते.
-
कर्क राशीच्या मंडळींसाठी शनी देवाचे वक्री होणे खूप लाभदायक ठरु शकते. कारण शनी या राशीच्या नवम भावात म्हणजेच भाग्यस्थानात वक्री होणार आहेत. त्यामुळे या काळात नशिबाची साथ मिळू शकते. जे लोक संशोधन, किंवा व्यवसायात आहेत त्यांना विशेष यश मिळू शकतो.
-
त्याचबरोबर गुंतवणूक, मालमत्ता आणि आर्थिक लाभाचे संधीदेखील मिळू शकतात. करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या नव्या व्यक्तींच्या रूपातून धनलाभाचे योग आहेत.
-
मकर राशीसाठी शनिची उलटी चाल फायदेशीर ठरु शकते. शनी या राशीच्या तृतीय भावात वक्री होणार आहेत, ज्यामुळे धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकते, तसेच नोकरी करणाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीची शक्यता आहे.
-
शनी या राशीचे धनस्थान आणि लग्नस्थान सुद्धा सांभाळत असल्यामुळे आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. वरिष्ठ लोकांशी चांगले संबंध तयार होतील जे भविष्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीच्या चालीनं बदलणार नशीब, मिळणार राजसुख! १३९ दिवस शनी महाराजांचे लाड कोणावर?
Shani Dev Vakri In Meen: न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव या राशींना देऊ शकतात सुखाचे दिवस…पाहा तुमची रास आहे का यात…
Web Title: Saturn gochar 2025 shani vakri in meen these zodiac sign will be lucky pdb