• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sant kabirdas jayanti 2025 top 10 quotes to transform your life svk

कबीर दासांचे ‘हे’ १० अमृतसमान विचार, आयुष्याला देतात नवी दिशा

१५ व्या शतकातील महान संत कबीर दास यांचे ओवे आजही लोकप्रिय आहेत. कबीर दास यांचे ओवे जीवनाचा मार्ग दाखवणारे ओवे आहेत. ते नवीन गोष्टी शिकवतात. ते आपल्याला वाईटापासून देखील वाचवतात.

June 11, 2025 12:57 IST
Follow Us
  • Kabir Jayanti 2025
    1/10

    १. मनाने हरलो तर हार निश्चित; पण मनाने जिंकलो तर विजय अटळ! कबीर म्हणतात – परमेश्वराला गाठायचं असेल तर मनावर विश्वास ठेवा. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 2/10

    २. खऱ्या प्रेमाचा शोध घेत मी भटकत राहिलो, पण कुठेच सच्चा प्रेमी सापडला नाही. जेव्हा खरा प्रेमी दुसऱ्या खऱ्या प्रेमीला भेटतो, तेव्हा जगातील सगळं विषही अमृतासारखं वाटू लागतं. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 3/10

    ३. कधी काबा, कधी काशी — सर्वत्र एकच परमेश्वर! गहू दळल्यावर तोच मैदा उरतो, तसंच राम-रहीम भेद नाही उरत. कबीर तर शांतपणे त्याच परमात्म्याच्या प्रेमात मग्न आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 4/10

    ४. सगळं जग गाढ झोपलंय, पण संतांच्या डोळ्यांना झोपच येत नाही — कारण मृत्यू त्यांच्याच डोक्यावर उभा आहे, जणू वर लग्नाच्या बोहल्यावर आला आणि वेळ संपली. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 5/10

    ५. रडलो तर मन कमकुवत होतं, हसलो तर ईश्वर नाराज होतो… म्हणून आतल्या आतच सगळं सहन करावं लागतं – जसं कीडा लाकडातच आपली ओळ काढतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 6/10

    ६. सातही समुद्रांची शाई केली, जंगलातील सारे वृक्ष लेखणी बनवले आणि सगळ्या पृथ्वीला कागद केलं, तरीही हरिचे गुण लिहून संपणार नाहीत. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 7/10

    ७. जिवंतपणीच मरण शिकलो, तरच खऱ्या अर्थाने मुक्त होता येतं. जो मरण्यापूर्वीच आत्मबोध करून घेतो, त्याला ना काळ मारू शकतो, ना मृत्यू – तो अजय, तोच खरा अमर.

  • 8/10

    ८. वाईट शोधायला बाहेर पडलो, पण कोणीच वाईट वाटला नाही… स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं, तेव्हा उमगलं — खरं वाईटपण माझ्याच आत लपलं आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 9/10

    ९. शब्द असे बोला की मनातील अहंकार हरवून जावा, ते शब्द इतरांना शीतलता देतील आणि स्वतःलाही शांततेचा स्पर्श देतील. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 10/10

    १०. संताची जात विचारू नका, त्याचं ज्ञान विचारून पाहा — कारण मोल तलवारीचं असतं, म्यानाचं नाही. (छायाचित्र: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Sant kabirdas jayanti 2025 top 10 quotes to transform your life svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.