• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. planning mathura vrindavan trip dont miss these 5 divine places svk

मथुरा-वृंदावन दर्शनाची योजना आहे? मग ‘या’ पाच ठिकाणी नक्की जा – समाधान आणि भक्ती दोन्ही मिळेल

मथुरा-वृंदावन भेट देण्यासाठी टॉप ५ ठिकाणे: जर तुम्हीही मथुरा येथे जाण्याचा विचार करत असाल, तर येथे काही ठिकाणे आहेत जी तुम्ही अवश्य भेट द्यावीत. मथुरा-वृंदावनमधील ही खास ठिकाणे तुम्हाला केवळ मनःशांतीच देणार नाहीत तर तुमची सहल यशस्वी देखील करतील.

Updated: June 12, 2025 12:26 IST
Follow Us
  • Mathura, Vrindavan places
    1/6

    मथुरा-वृंदावन भेट देण्यासाठी अवश्य पाहावीत अशी पाच ठिकाणं
    भगवान श्रीकृष्णाची भूमी – मथुरा आणि वृंदावन – ही फक्त धार्मिक स्थळं नाहीत, तर ती एक आत्मिक अनुभूती देणारी ठिकाणं आहेत. येथे प्रत्येकाच्या मनात एकदा तरी भेट देण्याची तीव्र इच्छा असते. मथुरा, जिथे स्वयं श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वृंदावन, जिथे त्यांच्या बाललीला आणि रासलीला घडल्या – ही दोन्ही शहरे भक्ती, इतिहास आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहेत.
    या ठिकाणी पाऊल ठेवताच मनाला जी शांती मिळते, ती शब्दांत सांगता येणार नाही. (चित्र – सोशल मीडिया)

  • 2/6

    बांके बिहारी मंदिर, वृंदावन – जिथे भक्तीला वेळेचं बंधन वाटत नाही
    गजबजलेल्या गल्लीत वसलेलं बांके बिहारी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भक्तांसाठी एक जिवंत अनुभूती आहे. भगवान श्रीकृष्णाच्या ‘बांके बिहारी’ रूपाला समर्पित हे मंदिर, वृंदावनमधील सर्वात प्रिय आणि पूजनीय स्थळ मानलं जातं.
    येथे दर्शनाची रीतही अनोखी आहे – प्रभूचे दर्शन काही क्षणांपुरतेच होते. प्रत्येक काही सेकंदांनी पडदा ओढून दर्शन थांबवले जाते. असे मानले जाते की, प्रभूच्या तेजस्वी मूर्तीचे दर्शन सतत होऊ नये, कारण त्यांचे सौंदर्य पाहून भक्त मंत्रमुग्ध होऊन तंद्रीत हरवून जातात.
    मथुरा रेल्वेस्थानकापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेले हे मंदिर सहजपणे ऑटो किंवा ई-रिक्षाच्या मदतीने गाठता येते. (चित्र – सोशल मीडिया)

  • 3/6

    गोवर्धन पर्वत आणि गिरिराज जी मंदिर – श्रद्धेचा अद्वितीय अनुभव
    भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत हे भक्तांसाठी अतिशय पवित्र ठिकाण आहे. येथे २१ किमीची ‘परिक्रमा’ करून भक्त आध्यात्मिक ऊर्जा अनुभवतात. गिरिराज जी मंदिर हे या भक्तिमय यात्रेचे केंद्र आहे. मथुरेपासून अवघ्या २२ किमी अंतरावर असलेले हे स्थळ, भक्ती आणि शांततेचा संगम आहे. (चित्र – सोशल मीडिया)

  • 4/6

    श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर – जिथे भक्तीचा उगम झाला
    मथुरेतील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर. हेच ते स्थान आहे, जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला होता. त्या ऐतिहासिक तुरुंगाचे दर्शन आजही येथे घेता येते आणि ती अनुभूती अत्यंत भावनिक व आध्यात्मिक असते. सुंदर वास्तुकला आणि श्रद्धेचा गड असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते, विशेषतः जन्माष्टमीच्या दिवशी. मथुरा जंक्शनपासून केवळ ३-४ किमी अंतरावर असलेले हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. (चित्र – सोशल मीडिया)

  • 5/6

    प्रेम मंदिर – सौंदर्य, भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक
    पांढऱ्या संगमरवरात कोरलेलं प्रेम मंदिर, राधा-कृष्ण आणि सीता-राम यांच्या प्रेमाची जिवंत अनुभूती देतं. दिवसा त्याचं सौंदर्य मंत्रमुग्ध करतं, पण रात्री रंगीबेरंगी प्रकाशात हे मंदिर आणखीनच मोहक दिसतं. संध्याकाळचा रासलीला शो हे खास आकर्षण आहे. मथुरा जंक्शनपासून सुमारे १२ किमीवर असलेल्या या मंदिरात टेम्पो किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येतं. (फोटो – सोशल मीडिया)

  • 6/6

    राधा रमण मंदिर – आत्म्याला स्पर्श करणारी भक्तीची अनुभूती
    वृंदावनमधील राधा रमण मंदिर हे राधा-कृष्णाच्या शाश्वत प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. येथे श्रीकृष्णाची ‘स्वयंभू’ मूर्ती असल्याचं मानलं जातं, जी स्वतः प्रकट झाली. विशेष म्हणजे, राधाजींची मूर्ती नसली तरी त्यांचे वस्त्र व अलंकार श्रीकृष्णासोबत विराजमान आहेत. मंदिरातील शांत व भक्तिमय वातावरण मनाला गहिवरून टाकतं. मथुरा रेल्वेस्थानकापासून सुमारे १२ किमीवर असलेलं हे मंदिर ऑटोने सहज गाठता येतं. (चित्र – सोशल मीडिया)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Planning mathura vrindavan trip dont miss these 5 divine places svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.