• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sun tan removal home remedies for glowing skin without expensive treatments svk

उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? मग हे घरगुती उपाय नक्की करा

त्वचेवर टॅनिंग होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु त्यासाठी महागड्या उत्पादनांची किंवा उपचारांची आवश्यकता नाही. थोडी काळजी आणि या घरगुती उपायांनी, तुम्ही नैसर्गिक पद्धतीने तुमची त्वचा पुन्हा चमकदार आणि टॅनमुक्त करू शकता.

June 12, 2025 17:45 IST
Follow Us
  • Sun Tan Remedies
    1/12

    उन्हाळा म्हटलं की बीचवरची मजा, सहली आणि बाहेरच्या फिरण्याची धमाल! पण, याचसोबत येतो तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम वाऱ्यांचा त्रास, जो आपल्या त्वचेसाठी मोठं आव्हान बनतो. खरं तर, सूर्यकिरणांमधून मिळणारे व्हिटॅमिन D आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असले, तरी जास्त वेळ उन्हात घालवल्यास त्वचेवर टॅनिंग, निस्तेजपणा आणि सनबर्नसारख्या त्रासदायक समस्या निर्माण होतात, त्यामुळे उन्हात आनंद घेणं जपूनच गरजेचं आहे.

  • 2/12

    काळजी करू नका! महागड्या क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्सची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही सोपे, नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येणारे उपाय, जे त्वचेवरील टॅनिंग दूर करून तुम्हाला परत देऊ शकतात तुमचा नैसर्गिक ग्लो आणि तेज. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/12

    टॅटॅनिंगवर लिंबाची जादू
    उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग झालंय? मग लिंबाचे हे नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतात! लिंबामध्ये असणारं सायट्रिक अॅसिड त्वचेला सौम्यपणे exfoliate करतं आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतं. एक ताजं लिंबू घ्या, त्याचा रस टॅन झालेल्या भागावर थेट लावा, काही मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन टाका. लक्षात ठेवा, लिंबू लावल्यावर लगेच उन्हात जाणं टाळा अन्यथा त्वचा अजून सेंसिटिव्ह होऊ शकते! (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/12

    काकडी आणि गुलाबपाण्याचा थंडावा
    उन्हामुळे त्वचा गरम आणि थकलेली वाटतेय? मग काकडी आणि गुलाबपाण्याचा हा शीतल स्पर्श नक्की अनुभवून पाहा. काकडी त्वचेला थंडावा देते, तर गुलाबपाणी त्वचेची ताजेतवानी अनुभूती परत आणते. दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. त्वचा लगेचच फ्रेश आणि शांत वाटेल.
    हा उपाय संवेदनशील त्वचेसाठी खास उपयोगी ठरतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/12

    हळद आणि बेसनाचा देशी पॅक
    प्राचीन काळापासून सौंदर्यासाठी वापरला जाणारा हा पारंपरिक उपाय आजही तितकाच प्रभावी आहे. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला इन्फेक्शनपासून वाचवतात, तर बेसन त्वचेला सौम्यपणे exfoliate करत टॅनिंग दूर करण्यास मदत करतो. दोन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडं गुलाबपाणी किंवा दूध यांचं मिश्रण करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या भागावर लावा. पॅक वाळल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका आणि अनुभव घ्या उजळ, मऊ त्वचेचा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/12

    पपई आणि मधाचा हा स्वादिष्ट फेस मास्क नक्की करून पाहा! दोन चमचे पपईची पेस्ट आणि एक चमचा मध एकत्र मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पपई त्वचेला नर्म करते, तर मध त्वचेचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक चमक आणतो. २० मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुऊन टाका आणि अनुभवा हळूहळू उजळणारी, मृदू आणि पोषणयुक्त त्वचा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/12

    ताक आणि ओटमिल स्क्रब
    ताक आणि ओटमिल समान प्रमाणात मिसळून तयार करा एक सौम्य स्क्रब. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा आणि नंतर धुऊन टाका. यामुळे मृत त्वचा सहज निघून जाईल आणि त्वचा मऊ, स्वच्छ व नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/12

    टोमॅटो आणि दह्याचा कूलिंग कॉम्बो
    दही त्वचेला मृदू मॉइश्चर देतं, तर टोमॅटोमधील लायकोपिन टॅनिंग कमी करण्यात मदत करतं. २ चमचे दह्यात १ चमचा टोमॅटो रस मिसळा, चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवून टाका. परिणाम फ्रेश, उजळ आणि सॉफ्ट त्वचा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/12

    चंदनाची शीतलता
    चंदन त्वचेला थंडावा देतं आणि जळजळ कमी करतं. त्याची पेस्ट तयार करून टॅन झालेल्या भागावर लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवून टाका. इच्छा असल्यास चंदन पावडर गुलाबपाण्यात मिसळूनही वापरू शकता. त्वचेला मिळेल शांतता आणि ताजेपणा. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 10/12

    हळद आणि दुधाचं जादूई मिश्रण
    हळद आणि दूध यामध्ये त्वचा उजळवण्याची नैसर्गिक ताकद असते. हे मिश्रण तयार करून टॅन झालेल्या भागावर दररोज लावा. नियमित वापरल्याने त्वचा हळूहळू उजळ आणि नितळ दिसू लागेल. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 11/12

    अननस आणि मधाचा एन्झाइम पॅक
    अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन एन्झाइम मृत त्वचा हटवण्यास मदत करतं, तर मध त्वचेला पोषण देतो. २ चमचे अननस पेस्टमध्ये १ चमचा मध मिसळा आणि लावा. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 12/12

    लक्षात ठेवा – सुंदर त्वचेसाठी काही सोप्या सवयी!
    कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे. उन्हात जाण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लावा आणि परतल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवायला विसरू नका. या छोट्या सवयी तुमच्या त्वचेला सुरक्षित आणि ताजं ठेवतील. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Sun tan removal home remedies for glowing skin without expensive treatments svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.