-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रह प्रवेश करतात, ज्यामुळे ग्रहांची युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या युतीचा अनेकदा शुभ तर अनेकदा अशुभ प्रभाव देखील पडतो. येत्या १५ जून रोजी मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरूच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा योग तब्बल १२ वर्षानंतर मिथुन राशीत निर्माण होणार असल्याचे म्हटले जात आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर अधिक शुभ प्रभाव पडलेला पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्रिग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्रिग्रही योग कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पैसा, प्रेम अन् नवी नोकरी मिळणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर पडणार त्रिग्रही योगाचा शुभ प्रभाव
Trigrahi Yog 2025: येत्या १५ जून रोजी मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरूच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल.
Web Title: Trigrahi yog 25 in mithun rashi these three rashi will be happy sap