• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is scoliosis and why it affects girls more than boys svk

मुलांपेक्षा मुलींमध्ये सात पट जास्त आढळणारा स्कोलियोसिस आजार नेमका आहे तरी काय?, वाचा…

स्कोलियोसिस म्हणजे पाठीचा कणा S किंवा C आकारात वळणे. ही समस्या किशोरवयीन मुलांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. ही स्थिती केवळ शरीरावर नाही, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. १३ वर्षांची आद्या स्कोलियोसिसमुळे त्रस्त होती, पण योग्य वेळी निदान आणि आधुनिक शस्त्रक्रियेमुळे तिचं आयुष्य पूर्ववत झालं. पालक आणि शाळांनी वेळेवर लक्षणं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

June 28, 2025 10:14 IST
Follow Us
  • Amrita Hospital Doctors Straighten 50-Degree Spine Curve in Remarkable Surgery
    1/9

    स्कोलियोसिस म्हणजे नेमकं काय?
    स्कोलियोसिस ही पाठीचा कणा सरळ नसून S किंवा C आकारात वळलेली स्थिती आहे. ही समस्या बहुतेक वेळा किशोरवयीन मुलांमध्ये आढळते, विशेषतः १० ते १५ वयोगटात. मुलींमध्ये ही समस्या मुलांपेक्षा सात पट जास्त दिसून येते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

    ही साधी वाटणारी समस्या गंभीर ठरू शकते
    पाठीचा कणा वाकल्यामुळे केवळ दिसण्यात फरक पडत नाही, तर त्याचा फुफ्फुसे आणि हृदयावरही परिणाम होऊ शकतो. वेळेवर उपचार न घेतल्यास तीव्र त्रास आणि अपंगत्वाची शक्यता असते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/9

    आद्याची प्रेरणादायक कहाणी
    १३ वर्षांची आद्या स्कोलियोसिसने त्रस्त होती. तिचा कणा ५० अंश वाकला होता. पण, अमृता हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ती केवळ पाच दिवसांत डिस्चार्ज झाली आणि तीन आठवड्यांत पुन्हा शाळेत जाऊ लागली. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/9

    उपचारातील आधुनिक तंत्रज्ञान
    डॉ. तरुण सुरी यांच्या टीमने अत्याधुनिक साधनांचा वापर करून अत्यंत अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया केली, त्यामुळे रुग्णाची वेगाने रिकव्हरी होऊ शकली. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/9

    लवकर निदान = लवकर सुटका
    स्कोलियोसिस ओळखण्यात वेळ दवडू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार केल्यास मुलांचे आयुष्य पूर्ववत होऊ शकते. ही फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्याचीही बाब आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/9

    स्कोलियोसिस आणि मानसिक आरोग्य
    स्प्रिंगर नेचरच्या २०२४ च्या अहवालानुसार, स्कोलियोसिस असलेल्या ५८% तरुणांना चिंता, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/9

    पालक आणि शाळांची सजग भूमिका
    आद्याच्या आईने सुरुवातीला कंबरेचा वाकलेपणा चुकीच्या बसण्यामुळे झाला असावा असे गृहीत धरले. परंतु, स्कोलियोसिसचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांकडून योग्य माहिती मिळाल्याने वेळेत उपचार सुरू करता आले.
    डॉ. सुरी सांगतात, “शाळा आणि पालक दोघांनीही स्कोलियोसिसचे लक्षण ओळखायला शिकले पाहिजे. लवकर लक्ष दिल्यास मोठे त्रास टाळता येतात.” (छायाचित्र स्रोत: अमृता हॉस्पिटल)

  • 8/9

    स्कोलियोसिस मुलींमध्येच जास्त का?
    आजही ८०% प्रकरणांमध्ये स्कोलियोसिस का होते हे नक्की सांगता येत नाही. मात्र हार्मोनल बदल, वाढीचा वेग आणि अनुवंशिक कारणे यामागे असू शकतात. विशेषतः मुलींमध्ये हा विकार जास्त गतीने वाढतो, म्हणून त्याची तीव्रतादेखील अधिक असते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/9

    वेळीच ओळखले तर धोका टळतो
    स्कोलियोसिसचा वक्रपणा बऱ्याच वेळा सुरुवातीला दिसत नाही. पण, वेळेवर निदान झाल्यास शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही कमी करता येतात. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: What is scoliosis and why it affects girls more than boys svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.