-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शुक्र २९ जून रोजी दुपारी ०२ वाजून ०८ मिनिटांनी आपली स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्याच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्राचे हे राशीपरिवर्तन खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीतच शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
आजपासून नुसता पैसा! शुक्राच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ
Shukra Gochar 2025: शुक्र २९ जून रोजी दुपारी ०२ वाजून ०८ मिनिटांनी आपली स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्याच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल.
Web Title: Shukra rashi parivartan 25 these three zodic get money sap