-
पावसाळा सुरू झाला की, थंडगार वातावरण, सगळीकडे हिरवळ दिसू लागते. पण, याउलट जोरदार पाऊस पडल्यामुळे घरात कुबट वास येऊ लागतो. सूर्यप्रकाश नसल्यामुळे कपडे सुकत नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
दारे- खिडक्या बंद राहतात आणि मग पावसात भिजलेल्या छत्री, चपला घरात ठेवल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वास येऊ लागतो आदी समस्या जाणवू लागतात. मग अशा वेळी कितीही रूम फ्रेशनर वापरला तरीही घरातून येणारा कुबट वास काही केल्या जात नसतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
त्यामुळे पावसाळ्यात तुमचे कपडे फ्रेश आणि स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे असते. कारण- ओले कपडे घातल्यावर तुम्हाला संसर्ग, अंगाला खास सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. तेव्हा कपडे फ्रेश आणि स्वच्छ ठेवण्यासाठीच्या टिप्स… (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. अँटी-बॅक्टेरियल डिटर्जंट वापरा –
पावसाळी वातावरणात सगळीकडे ओलसर वातावरण तयार होते; जे कपड्यांवर जीवाणू, बुरशीजन्य संसर्ग वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे कपड्यांवरील जंतू आणि घाणेरडा वास काढून टाकण्यासाठी कपड्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले डिटर्जंट टाका किंवा जंतुनाशक डेटॉल किंवा सॅव्हलॉन वापरा. (फोटो सौजन्य: @Freepik ) -
२. कपडे ताबडतोब धुवा –
तुमच्या शरीराचा घाम, पावसाचे पाणी आणि ओलसरपणा यांमुळे जीवाणू जमा होतात आणि मग वास येऊ लागतो. त्यामुळे ओले कपडे जास्त वेळ खिळ्याला, बाथरूममध्ये किंवा बादलीत ठेवू नका, वेळच्या वेळी ते लगेच धुऊन टाका. (फोटो सौजन्य: @Freepik) -
३. कपडे वाळवणे –
पावसाच्या पाणी आणि आर्द्रता यांमुळे सूर्यप्रकाश कमी होतो, ज्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि बुरशीजन्य संसर्गात वाढ होते. त्यामुळे खिडकीजवळ किंवा पंख्याखाली कपडे वाळवा. नाही तर कपडे वाळवण्याचे स्टँड वापरा. त्यामुळे कुबट वास कमी होऊन, कपडे लवकर वाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
४. हलके कापड घाला –
जाड कपड्यांमध्ये जास्त ओलावा टिकून राहतो. त्यामुळे सुकण्यास जास्त वेळ लागत असल्याने दुर्गंधी, बुरशीजन्य वाढीचा धोका वाढतो. त्यामुळे नरम, हलके कपडे वापरा; जे लवकर सुकतात. (फोटो सौजन्य: @Freepik ) -
५. कपडे वाळल्यानंतर इस्त्री करा
कपडे सुकल्यानंतरही काही प्रमाणात ओलावा टिकून राहतो. त्यामुळे जीवाणू वाढू शकतात. त्यामुळे उर्वरित ओलावा काढून टाकण्यासाठी इस्त्री वापरा. विशेषतः आतील कपडे आणि मोजे सुकविण्यासाठी तुम्ही हा जुगाड करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
पावसात कपड्यांना येणार नाही कुबट वास! फक्त ‘या’ साध्या गोष्टी आजपासूनच करा ट्राय
Tips To Keep Clothes Fresh : दारे- खिडक्या बंद राहतात आणि मग पावसात भिजलेल्या छत्री, चपला घरात ठेवल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वास येऊ लागतो आदी समस्या जाणवू लागतात
Web Title: Tips to keep your clothes fresh and clean during monsoon asp