• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon hair care tips to avoid hair fall damage asp

पावसाळ्यात केस गळती वाढलीय? मग या ‘सोप्या’ गोष्टी करा फॉलो; एक केसही गळणार नाही

Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात निरोगी केस राखण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे…

July 6, 2025 19:11 IST
Follow Us
  • How to stop hair fall in monsoon naturally
    1/8

    पावसाळा सुरू झाला आहे. त्याबरोबरच आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. आर्द्रतेमुळे तुमचे केस कुरळे होतात आणि केस मोठ्या प्रमाणात गळून, त्यांचे नुकसानसुद्धा होऊ शकते. आपल्याला पावसाळ्यात भिजायला भरपूर आवडते. त्यामुळे रिमझिम पडणाऱ्या पावसात आपण छत्रीसुद्धा उघडत नाही. पण, पावसाळ्यात तुमच्या केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    त्यामुळे तुमची टाळू निरोगी राहण्यास, केस गळणे आदी केसांचे नुकसान टाळण्यासदेखील मदत होऊ शकते. केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. कारण- खराब झालेले केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि तुमच्या टाळूच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    पावसाळ्यात निरोगी केस राखण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे…(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    तुमची टाळू स्वच्छ, कोरडी ठेवा – पावसाळ्यात वाढती आर्द्रता आणि वारंवार पडणारा पाऊस यांमुळे तुमच्या टाळूला घाम येऊन, त्वचा तेलकट बनते. परिणामी बुरशी आणि जीवाणूजन्य संसर्गाचा त्रास होऊ शकतात. तुम्ही तुमचे केस नियमितपणे सौम्य, सल्फेट-फ्री शॅम्पूने धुऊ शकता, ज्यामुळे केसांतील जास्त तेल, घाम, घाण काढून टाकण्यास मदत मिळू शकते. पावसात भिजल्यानंतर तुमची टाळू पूर्णपणे कोरडी करा. त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि त्वचेची जळजळ टाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    मायक्रोफायबर टॉवेल वापरा – केस धुतल्यावर रोजचा टॉवेल ओल्या केसांवर बांधल्यास केस कडक होऊ शकतात, ज्यामुळे पावसाळ्यात केस अधिक नाजूक बनतात. त्याऐवजी तुम्ही तुमचे केस हळुवारपणे सुकविण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता. त्यामुळे घर्षण कमी होऊन, केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    सीरम किंवा कंडिशनर लावा – आर्द्रतेमुळे केसांचे क्युटिकल (cuticles) उघडू शकतात; ज्यामुळे केसांचा कुरळेपणा वाढून केस कोरडे होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात अँटी-फ्रिज सीरम किंवा लीव्ह-इन कंडिशनर वापरा. ​​त्यामुळे केसांभोवती एक संरक्षण आवरण निर्माण होते, ज्यामुळे केसांतील ओलावा टिकून राहतो आणि इतर पर्यावरणीय घटकांपासून तुमचे केसही सुरक्षित राहतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    केस नियमितपणे ट्रिम करा – केसांना नियमित ट्रिमिंग करा. त्यामुळे खराब झालेले केस काढून टाकण्यास आणि केस तुटण्यापासून रोखण्यास मदत मिळते. परिणामी तुमचे केसही व्यवस्थित दिसतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    जास्त तेल लावणे टाळा – तेल लावल्याने टाळूचे पोषण होण्यास मदत मिळते; परंतु जास्त तेल लावल्याने पावसाळ्यात केस ओले होऊन, त्यात मळ साचू शकतो. त्यामुळे जेल, वॅक्स यांसारखी स्टायलिंग उत्पादने टाळा. कारण- तसे केल्याने केस आणखी तेलकट होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Monsoon hair care tips to avoid hair fall damage asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.