-
अंकशास्त्रामध्ये तुमच्याशी निगडीत गोष्टी आणि तुमच्या जन्मतारखेला विशेष महत्व आहे. यामध्ये दुचाकी, कार ते मोबाईल या सर्वांचा समावेश होतो. व्यक्तीची राशी आणि जन्म तारखेनुसार अंक शुभ आणि अशुभ संकेत देखील देतात, त्यामुळे मोबाईलच्या शुभ अंकांबद्दल कसे जाणून घ्यावे ते पाहुयात.
-
या नव्या युगात सर्वांकडे मोबाईल असतो. पण तुम्हाला माहित आहे का की त्याचे क्रमांक तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात. अंकशास्त्र सांगते की मोबाईल क्रमांकातला प्रत्येक आकडा हा भाग्याशी म्हणजेच नशिबावर परिणाम करणारा असतो.
-
तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ हे कसे माहित कराल चला तर मग जाणून घेऊया.
-
सर्वात आधी ‘मूलांक’ म्हणजे रूट नंबर तुमच्या जन्मतारखेतून मिळणारा अंक. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म १५ तारखेला झाला असेल, तर १ + ५ = ६. म्हणजे त्याचा मूलांक ६ होतो.
-
आता याच पद्धतीने तुमच्य मोबाईल क्रमांकातील सर्व क्रमांक एकत्र लिहा. त्यानंतर त्यांची बेरीज करा. ही संख्या तुम्हाला एका डिजिटमध्ये येईपर्यंत हे करायचे आहे. या अंकांची तुलना तुमच्या मूलांकाशी करा.
-
आता याच पद्धतीने तुमच्य मोबाईल क्रमांकातील सर्व क्रमांक एकत्र लिहा. त्यानंतर त्यांची बेरीज करा. ही संख्या तुम्हाला एका डिजिटमध्ये येईपर्यंत हे करायचे आहे. या अंकांची तुलना तुमच्या मूलांकाशी करा.
-
अंकशास्त्रात १, ३, ५, ७ आणि ९ हे अंक अत्यंत शुभ मानले जातात. तर दुसरीकडे, २, ४, ६ आणि ८ हे अंक अशुभ मानले जातात.
-
विशेषतः मोबाईल क्रमांकाचा शेवट ४ किंवा ८ अंकावर होत असेल, तर जीवनात अनावश्यक अडथळे आणि मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. असे, ज्योतिषी सांगतात.
-
(ही माहिती सामान्य माहिती आणि अंक शास्त्रावर आधारित आहे, लोकसत्ता यामधल्या कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही)
Mobile Number Numerology: तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्यासाठी शुभ की अशुभ? ‘या’ सोप्या पद्धतीने स्वतः जाणून घ्या…
Mobile Number Numerology: तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्यासाठी शुभ की अशुभ आहे हे तुम्ही स्वतः देखील जाणून घेऊ शकता.
Web Title: Is your mobile number auspicious or inauspicious for you find out for yourself in this easy way numerology astrology spl