Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what happens if you eat too much breakfast bharti singh lose weight tips asp

सकाळी भरपूर नाश्ता केल्यास वजन कमी करण्यात मदत होते का? भारती सिंगच्या सल्ल्यावर डॉक्टरांनी मांडले मत

Heavy Breakfast Benefits : सकाळी नाश्त्याला काय खावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. चहा घेतला की, ॲसिडिटी होते, दूध प्यायलं, तर कफ होतो आणि पोळी-भाजी किंवा आणखीन काही हलकं-फुलकं खाल्लं, तर मळमळते किंवा उलटी सारखे वाटू लागते…

July 24, 2025 23:36 IST
Follow Us
  • What Happens If You Eat Too Much Breakfast
    1/8

    सकाळी नाश्त्याला काय खावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. चहा घेतला की, ॲसिडिटी होते, दूध प्यायलं, तर कफ होतो आणि पोळी-भाजी किंवा आणखीन काही हलकं-फुलकं खाल्लं, तर मळमळते किंवा उलटी सारखे वाटू लागते. अशातच ज्यांना वजन कमी करायचे असते, त्यांना तर अगदी आरोग्यदायी नाश्ता करावा लागतो आणि शरीरप्रकृतीनुसार आहार ठरवून, त्याचे नियमितपणे पालन करावे लागते. तर हिंदी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व कॉमेडियन भारती सिंहने नाश्ता आणि एकूणच आहारात ती काय खाते याबद्दलची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    भारती सिंहने पती हर्ष लिंबाचियासह तिच्या यूट्युब चॅनेलवर अभिनेत्री रिद्धी डोगरा यांच्याशी झालेल्या संभाषणात, ती तिन्ही वेळेला व्यवस्थित जेवते आणि वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग करते, असे सांगितले आहे. भारतीला उठल्याबरोबर भूक लागते. मग ती उठल्यानंतर अंघोळीच्या आधी खायला बसते. ती पराठा, रात्रीची भाजी व हाफ फ्राय अंडे खाते. दूध किंवा दही नाही, तर आले टाकून केलेला चहा आणि व्हाईट बटर खाते. हे ऐकून, “लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आहात, असं तुम्हाला वाटलं असेल”, असं अभिनेत्री संवादरम्यान बोलताना दिसते आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    पण, भारती सिंह दिवसातील ६ ते ७ दरम्यान शेवटचे अन्न खाते. तर अशा प्रकारे आहार घेऊन भारती आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिनचर्येचे पालन करीत होती. तिच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सकाळी पोटाची पचनशक्ती जास्त असते. म्हणून तुम्ही अधूनमधून उपवास करू शकता. पण, सकाळी जास्त प्रमाणात नाश्ता करा. याचा अर्थ तुम्ही तुमचा उपवास संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरू करू शकता. पचनशक्ती सकाळी ८ ते ९ दरम्यान जास्त असते. पण शेवटी, ते शरीरावर अवलंबून असते, असे भारती म्हणाली. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    तर, सकाळी भरपूर नाश्ता करण्याचा फायदा काय चला जाणून घेऊ…
    परळ येथील मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या अंतर्गत औषधांच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, भरपूर नाश्ता एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतो आणि त्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता केल्याने चयापचय प्रक्रियेत गती निर्माण होऊ शकते आणि दैनंदिन कामांसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळू शकते. ‘फूल प्लेट’ नाश्त्यामध्ये बहुतेकदा प्रथिने, निरोगी चरबी व जटिल कार्बोहायड्रेट्सचे संतुलन असतात; जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर आणि दिवसाच्या उत्तरार्धात जेवणाची इच्छा कमी करण्यास मदत करू शकतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, पौष्टिक नाश्ता लक्ष केंद्रित करणे, संज्ञानात्मक कार्य व उत्पादकता सुधारू शकतो, ज्यामुळे भरपूर नाश्ता संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग बनतो, असे डॉक्टर अग्रवाल म्हणाल्या आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    पण, जास्त कार्बोहायड्रेट्स वजन कमी करण्यात अडथळा ठरू शकतात. सर्वांत महत्त्वाचे खाण्यावर नियंत्रण ठेवणे किंवा प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर अग्रवाल म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    याव्यतिरिक्त, जर तुम्ही योग्य रीतीने अन्नाचे सेवन केले, तर ते शरीराच्या उद्दिष्टांना पूरक ठरू शकते. या खाण्याच्या पद्धतीमध्ये सामान्यतः खाण्याच्या आणि उपवासाच्या कालावधीत सायकलिंगचा समावेश असतो, ज्यामुळे चयापचय लवचिकता वाढू शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते. पूर्ण नाश्ता करून आणि नंतर निर्धारित कालावधीसाठी अन्नापासून दूर राहिल्याने, व्यक्तींना वजन व्यवस्थापनाचे फायदे अनुभवता येतात, जळजळ कमी होते आणि पेशी दुरुस्ती प्रक्रियांना चालना मिळते, असे डॉक्टर अग्रवाल म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी दिनचर्या पोषक घटकांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवते आणि उपवास करताना खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रभावीपणे आधार मिळतो. संतुलित दृष्टिकोनामुळे शाश्वत ऊर्जा पातळी आणि एकूणच आरोग्य सुधारू शकते, असे डॉक्टर अग्रवाल म्हणाल्या आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What happens if you eat too much breakfast bharti singh lose weight tips asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.