• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is bottle gourd peel good for health or how to identify chemical free lauki asp

दुधीची साल फेकून देत असाल तर आत्ताच थांबा! फायदे वाचून व्हाल थक्क; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

How To Identify A Good Dudhi : भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू…

July 27, 2025 23:54 IST
Follow Us
  • how to identify chemical free lauki
    1/8

    दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. पण, ही भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    मुंबईतील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या क्लिनिकल डाएटिशियन चैताली राणे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, जे हायड्रेशन आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करू शकते. त्यात फायटोकेमिकल्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे शरीरात निर्माण होणारा ताण कमी करण्यास मदत करतात. ही कृती हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग असलेल्या व्यक्तींसाठी दुधीची भाजी खाणे भरपूर फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    दुधीची भाजी पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे बी कॉम्प्लेक्स व सीसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समृद्ध स्रोत आहे. कमी चरबीयुक्त पदार्थ आणि उच्च आहारातील तंतुमय गुणधर्मासह दुधी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण- दुधी रक्तदाब नियंत्रित करते आणि ताण व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. त्याचबरोबर अपचन, अल्सर, तणाव आणि नैराश्याला प्रतिबंधित आणि नियंत्रित करण्यास मदत करते. कारण- ते शरीरात मुक्त आम्ल रॅडिकल्सची निर्मिती कमी करतात; ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता व्यवस्थापित करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    पण, भाजी खाल्यानंतर हे सगळे आरोग्य फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही भेसळमुक्त दुधी खरेदी कराल. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. यांनी रसायनमुक्त, भेसळमुक्त दुधी ओळखण्याचे सांगितलेले तीन सोपे मार्ग खालीलप्रमाणे… (फोटो सौजन्य: @Freepik)

    १. आकार आणि पोत – मार्केटमधून दुधी खरेदी करताना तो आकारापेक्षा मोठा, ज्याचा रंग हलका हिरवा असेल आणि त्याची पोत कडक असेल असाच दुधी निवडा. ज्या भोपळ्यावर ओरखडे, हलके डाग आहेत, असा दुधी खरेदी करू नका. असा दुधी खराब किंवा त्यावर रासायनिक प्रक्रिया केलेल्याची ती चिन्हे असू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    २. सुगंध – ताज्या दुधीचा सुगंध मातीसारखा आणि सौम्य असतो. जर तुम्हाला दुधी खरेदी करताना विचित्र किंवा तीव्र रसायनाचा वास येत असेल, तर तो अजिबात खरेदी करू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    ३. सेंद्रिय सर्टिफिकेट – जेव्हा शक्य असेल तेव्हा सेंद्रिय दुधी वापरा. ​​सेंद्रिय उत्पादनांमध्ये कृत्रिम खते, कीटकनाशके किंवा इतर रसायनांचा वापर केला जात नाही. अशी उत्पादने खराब असण्याची शक्यता कमी असते. स्थानिक शेतकरी किंवा जे प्रसिद्ध दुकानदारांकडील उत्पादनांच्या बाबतीत सुरक्षितता, गुणवत्तेबाबत खात्री असेल, त्यांच्याकडून दुधी खरेदी करा. सेंद्रिय शेती पद्धतींना पाठिंबा दिल्याने शाश्वत आणि आरोग्यदायी अन्न वापरण्यासदेखील प्रोत्साहन मिळते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    दुधीची साल काढावी की नाही – दुधीची साल मध्यम जाड असते, जी आतील मांसाचे रक्षण करते. बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील सेवा, क्लिनिकल न्यूट्रिशन व डायटेटिक्सच्या प्रमुख एडविना राज म्हणाल्या की, कीटकनाशकांचे अवशेष आणि सालीचा पोत यांबद्दलची चिंता वैध आहे. त्यामुळे भाजी पाण्याखाली धुणे, साल हलक्या हाताने साल काढणे आणि शक्य असेल तेव्हा सेंद्रिय उत्पादनांचा वापर करणे या बाबी तुम्हाला खूप मदत करू शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    पण, शक्य असल्यास दुधीची साल पूर्णपणे काढून टाकू नका. कारण- दुधीच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय गुणधर्म असतात, जे पचनास मदत करतात आणि पोट भरलं आहे, अशी भावना देऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत करतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वेदेखील असतात; ज्यामुळे एकूण आरोग्य वाढण्यास मदत होते. दुधीच्या भाजीत पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणाव, जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दुधी या भाजीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यातील उच्च फायबर कन्टेन्ट आतड्यांची हालचाल सुधारू शकतात आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकतात, असे एडविना राज म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Is bottle gourd peel good for health or how to identify chemical free lauki asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.