-
ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी याच राशीत वक्री स्थितीत आहे आणि नोव्हेंबरमध्ये याच राशीत मार्गी होणार आहे शनीची ही सरळ चाल काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, २८ नोब्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनी मीन राशीत मार्गी होईल, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी मार्गी शनी खूप अनुकूल ठरेल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तूळ राशीच्या व्यक्तींना मार्गी शनीमुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील मार्गी शनी खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
शनीदेवाची मार्गी अवस्था ‘या’ तीन राशींसाठी भरभराटीची; कमावणार बक्कळ पैसा अन् नोकरी-व्यवसायात होणार प्रगती
Shani Dev Margi 2025: पंचांगानुसार, २८ नोब्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनी मीन राशीत मार्गी होईल, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
Web Title: Shani dev margi 25 makar tula and mithun sign get wealthy and healthy life sap