-
नैसर्गिक उपायांमध्ये तांदळाच्या पाण्याने केसांची वाढ वाढवण्याचा उपाय सध्या सौंदर्यप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय ठरतो आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, सी, ई आणि इनॉसिटॉल हे पोषक घटक असतात. ते केसांच्या मुळांना बळकटी देतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
त्यामुळे केसांची गळती कमी होते, केस मजबूत होतात आणि त्यांच्या वाढीचा वेगही वाढतो, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी अर्धा कप कच्चे तांदूळ दोन कप पाण्यात ३० ते ४५ मिनिटे भिजवून ठेवावेत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
हे पाणी गाळून स्वच्छ बाटलीत भरावं. अधिक परिणामकारकतेसाठी हे पाणी २४ तास झाकून ठेवून फर्मेन्ट करता येतं. (फोटो सौजन्य : FreePik)
-
शॅम्पूनंतर हे पाणी केसांना मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावावं आणि १५ मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने धुऊन टाकावेत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केसांना नैसर्गिक चमक, गडदपणा येतो आणि केसांची वाढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवू लागते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
तथापि, काही जणांच्या बाबतीत तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते. त्यामुळे हे पाणी वापरण्यापूर्वी त्याची चाचणी घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं शहाणपणाचं ठरेल. (फोटो सौजन्य : FreePik)
तांदळाचं पाणी केसांना लावण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या वापरण्याची पद्धत आणि फायदे….
Rice water for hair growth : तांदळाच्या पाण्यातील नैसर्गिक घटक केशमुळांना मिळते पोषण; नियमित वापराने केसगळतीत घट आणि वेगवान वाढ
Web Title: Rice water for hair growth benefits how to use after shampoo home remedy svk 05