-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ऑक्टोबरमध्ये शनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनी गुरूच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. शनीचे हे गोचर काही राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
कर्मदाता शनी करणार गुरूदेवाच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Shani Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, ऑक्टोबरमध्ये शनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनी गुरूच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. शनीचे हे गोचर काही राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
Web Title: Shani maharaj enter in purva bhadrapad nakshatra mithun kumbha and tula rashi will be happy sap