• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how long should dal be soaked or simple dal tips for every kitchen asp

दुप्पट प्रोटीन मिळवण्यासाठी डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी?

How To Soak Dal : डाळ बनवण्यासाठी त्या योग्य वेळेसाठी भिजवून ठेवल्या नाही तर त्यातील पोषक तत्वांवर त्याचा परिणाम होऊ शकतो

August 15, 2025 20:39 IST
Follow Us
  • Indian dal cooking tips
    1/8

    भारतीय स्वयंपाकघरात डाळ हा अविभाज्य घटक आहे. मांसाहार न करणाऱ्यांसाठी डाळी हा प्रोटीनचा खजिना आहेत. पण, अगदी कितीही कट्टर नॉनव्हेज खाणारा माणूस असला तरी घरच्या वरणभाताची सर कशालाच येऊ शकत नाही. शिवाय डाळी कॅल्शियमचासुद्धा स्रोत असतात. यामुळे आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 2/8

    त्यामुळे डाळ बनवण्याआधी आपण त्याला स्वच्छ धुतो. काही वेळेस त्यांना रात्री भिजत ठेवतो. पण, डाळ बनवण्यासाठी त्या योग्य वेळेसाठी भिजवून ठेवल्या नाही तर त्यातील पोषक तत्वांवर त्याचा परिणाम होऊ शकतो; याबद्दल तुम्हाला माहिती होतं का? नाही… (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 3/8

    तर आहारतज्ज्ञ शालिनी सुधाकर यांनी २५ जून २०२५ रोजी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये डाळी भिजवण्याचे महत्त्व आणि डाळ भिजवत ठेवलेल्या पाण्याला फेकून देऊ नका असे आवर्जून सांगितले आहे, कारण त्यात आवश्यक पोषक तत्वे असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 4/8

    त्यांनी व्हिडीओत सांगितले की, जर तुम्ही डाळ शिजवण्याआधी पुढील दोन चुका केल्या, तर तुम्हाला त्यातील महत्त्वाचे पोषक घटक तुमच्या शरीराला अजिबात मिळणार नाहीत. तर पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या डाळी किमान दोन तास भिजत ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/8

    सिस्टिक ॲसिडसारखे सर्व अँटी-न्यूट्रिएंट्स काढून टाकण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमचे आतडे डाळीतील जास्तीत जास्त प्रथिने शोषून घेण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    डाळ भिजवण्यापूर्वी ३ ते ४ वेळा धुवा – दुसरी गोष्ट म्हणजे डाळ भिजवलेले पाणी फेकून देऊ नका, तर स्वयंपाक करताना त्याचा वापर करा; कारण त्यात आवश्यक पोषक घटक असतात. डाळ भिजवलेल्या पाण्यात B आणि V सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. जर तुम्ही हे पाणी टाकून देत असाल तर तुम्ही ते जीवनसत्त्वे टाकून देत आहात. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 7/8

    ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या शरीराला चांगले पोषण मिळण्यासाठी हे पौष्टिक उपाय खूप जास्त महत्त्वाचे आहेत. धूळ, पॉलिश आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी डाळ भिजवण्यापूर्वी ३ ते ४ वेळा धुवा. डाळ भिजवताना पाणी स्वच्छ असल्याची खात्रीसुद्धा करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    डाळ खाण्याचे फायदे… वजन कमी करण्यासाठी वनस्पतीआधारित प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे डाळ होय. डाळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यास आणि आरोग्यास प्रोत्साहन देतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How long should dal be soaked or simple dal tips for every kitchen asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.