-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अलीकडेच सांगितले की तिचा कधीकधी डाव्या आणि उजव्या गोष्टींमध्ये गोंधळ उडतो. “मला Left- Right समस्या आहे. मला नेहमी स्वतःला सांगावं लागतं की काय डावं आहे आणि काय उजवं आहे,” तिने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
तिने या समस्येवर उपाय म्हणून तिचा मेंदू कसं काम करतो तेही सांगितलं, ती म्हणाली, माझा डावा हात आपोआप L बनवतो. दरम्यान, ही समस्या जगभरातल्या अनेक लोकांना येते. याबद्दल तज्ज्ञांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? (Photo: Freepik)
-
एखाद्या गोष्टीची दिशा किंवा बाजू निश्चित करणे वरवर सोपे वाटते पण प्रत्यक्षात त्यात स्थानिक गोष्टींबद्दल जागरूकता, स्मृती, भाषा प्रक्रिया आणि शरीर अभिमुखता यासारख्या मेंदूच्या जटिल कार्यांचा समावेश असतो, असे अपोलो हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले. (Photo: Freepik)
-
ही कार्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांद्वारे हाताळली जातात, विशेषतः पॅरिएटल लोब आणि डाव्या अँगुलर गायरसद्वारे. डॉ. कुमार म्हणाले. “जेव्हा तुम्ही मल्टीटास्किंग करत असता व चिंताग्रस्त असता किंवा तणावाखाली असता, तेव्हा तुमचा मेंदू क्षणभर गोंधळात जाऊ शकतो. (Photo: Freepik)
-
डिस्लेक्सिया, डिस्प्रॅक्सियामुळे स्थानिक तर्कशक्तीच्या समस्या उद्भवू शकतात. डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना नकाशे वाचण्यात, दिशानिर्देशांचे पालन करण्यात आणि त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातांबाबत गोंधळात टाकणाऱ्या समस्या येऊ शकतात. असे, डॉ. कुमार म्हणाले. (Photo: Freepik)
-
डाव्या आणि उजव्या बाजूंची ओळख पटवण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी युक्त्या-
डाव्या हाताने मनातल्या मनात ‘L’ चिन्ह काढणे, एका हातात अंगठी किंवा घड्याळ घालणे, कोणाला प्रतिसाद देण्यापूर्वी थोडावेळ थांबणे विचार करुन रिप्लाय देण. (Photo: Freepik) -
सामान्य?
ही समस्या सामान्य आहे. जगभरात १०-१५ टक्के लोकांना डावा- उजवा फरक करणे कठीण जाते, असे डॉ. कुमार म्हणाले. (Photo: Freepik) -
ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का?
डॉ. कुमार म्हणाले की, जोपर्यंत या गोष्टीमुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. (Photo: Freepik) -
ही समस्या तुम्हालाही आहे का? (Photo: Freepik) हेही पाहा-
अनन्या पांडेला आहे डाव्या आणि उजव्या गोष्टी ओळखण्याची समस्या; असे का होते? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
Confused with left and right : एखाद्या गोष्टीची दिशा किंवा बाजू निश्चित करणे वरवर सोपे वाटतेपण प्रत्यक्षात त्यात मेंदूची गुंतागुंतीची कार्ये समाविष्ट असतात.
Web Title: Why do some people have trouble with left and right ananya panday have this problem expert spl