-
घरी स्वयंपाक करताना अनेकदा काही सेकंदांसाठी का होईना लक्ष इकडे-तिकडे गेले की, कढईत ठेवलेली भाजी जळून किंवा करपून जाते. त्यामुळे कढईच्या कडेला काळा थर जमा होतो. अशा वेळी कढई स्वच्छ कशी करावी हा प्रश्न असंख्य स्त्रियांना पडतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मग घासून घासून अनेकदा हात दुखतो. पण, कढईचे डाग काही केल्या जात नाहीत. त्यावेळी मग काही घरगुती टिप्स कदाचित फायदेशीर ठरू शकतात; ज्या तुमच्या कढईला नवीन कढईसारखा लूक देतात. चला तर जाणून घेऊयात ही सोपी ट्रिक… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
@mini_stars95 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडीओत कढई स्वछ करण्याची एक भन्नाट ट्रिक दाखवली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सगळ्यात पहिला कढईत पाणी टाका. त्यात डिटर्जंट पावडर टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर बेकिंग सोडा, दोन ते तीन लिंबांचा रस पिळून लिंबाची सालसुद्धा त्याच पाण्यात टाका. अगदी शेवटी त्यात मीठ टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करा आणि थोडे पाणी उकळू द्या. व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे फेस वर येऊ लागला की, गॅस बंद करा. त्यानंतर कढई गॅसवरून उतरवून खाली ठेवा आणि तारेच्या काथ्याने घासण्यास सुरुवात करा. काहीच वेळात तुमची कढईची चमक पुन्हा परत येईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बहुतेक घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी ॲल्युमिनियम किंवा स्टील कढईचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत रोजच्या स्वयंपाकामुळे त्यात काळे डाग पडतात. त्यांना स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर त्यासाठी हा उपाय खूपच सोपा आणि अगदी आरामदायी आहे; जो तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता… सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mini_stars95 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो तुमच्यासाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
कढईचे काळे डाग जात नाही? मग न घासताच होईल मिनिटांत चकाचक; फक्त ‘हा’ सोपा उपाय करा
Kitchen Tips : कढईत ठेवलेली भाजी जळून किंवा करपून जाते. त्यामुळे कढईच्या कडेला काळा थर जमा होतो. अशा वेळी कढई स्वच्छ कशी करावी हा प्रश्न असंख्य स्त्रियांना पडतो.
Web Title: Home remedy to clean burnt and blackened kadai using baking soda lemon juice detergent and salt asp