-
आजकाल बाजारात अनेक अन्नपदार्थ ‘आरोग्यदायी’ म्हणून विकले जातात. उत्पादनांवरील आकर्षक लेबल्स पाहून आपण त्यांना दैनंदिन आहाराचा भाग बनवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे अन्न तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते?
-
डाएट कोक सोडा
डाएट कोकमध्ये शून्य कॅलरीज असल्या तरी त्यातील कृत्रिम गोड पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. नियमित सेवन टाळा. -
मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड
मल्टीग्रेन ब्रेड आरोग्यदायी वाटते; पण अनेकदा त्यात रिफाइंड धान्य मिसळलेले असते. त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. -
व्हेजिटेबल चिप्स
व्हेजिटेबल चिप्समध्ये भरपूर तेल आणि मीठ असते. आरोग्यदायी समजून खाल्ल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. -
पॅकेट फ्रूट ज्यूस
बाटलीबंद ज्यूस प्यायल्याने तुमचे शरीर ताज्या फळांप्रमाणे पोषण मिळत नाही. त्यात भरपूर साखर असते आणि गुणधर्म कमी असतात. -
एनर्जी बार्स
एनर्जी बार्समध्ये प्रथिने असली तरी त्यामध्ये जास्त साखर आणि कॅलरीज असतात. त्यामुळे त्याच्या नियमित सेवनामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
सावधान! ‘निरोगी’ असल्याच्या दावा करणारे; पण शरीरासाठी हानिकारक असलेले ‘हे’ ५ अन्नपदार्थ
आजकाल बाजारातील आरोग्यदायी म्हणून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमागील सत्य जाणून घ्या आणि तुमच्या आरोग्याचे रक्षण करा.
Web Title: These five foods that seem healthy but can damage your health tips svk 05