• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sugar swaps that dont feel like sacrifices 10194747 iehd import rak

Healthy Sugar Alternatives : गोड खा… पण साखर टाळा! जाणून घ्या आरोग्यासाठी उत्तम ६ पर्याय

healthy sugar alternatives | रिफाइंड साखर टाळणे म्हणजे गोडवा सोडून देणे असे नाही. निसर्गात भरपूर आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत.

August 19, 2025 21:53 IST
Follow Us
  • sugar, sugarswaps, sugar consumption, sugar and diabetes link
    1/7

    रिफाइंड साखर टाळणे याचा अर्थ गोड खाणेच सोडून देणे असा होत नाही. निसर्गाने भरपूर आरोग्यदायी पर्याय दिले आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. आज आपण सहा साखरेचेपर्याय जाणून घेणार आहेत संतुलित प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखर आणि ऊर्जा स्थिर ठेवतात. हे पर्याय विशेषतः रक्तातील साखरेच्या चढ-उतार असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

  • 2/7

    गूळ : हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ, गूळ लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांनी समृद्ध आहे. रिफाइंड साखरेपेक्षा वेगळा असून हे एकदम कमी प्रक्रिया केलेला असतो आणि भरपूर गोडवा देखील असतो. लाडू, चिक्की किंवा चहामध्ये वापरला जाणारा गूळ पचनास मदत करतो आणि नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवतो.

  • 3/7

    खजूर: खजूर हे निसर्गाचे कॅरॅमल आहे आणि हे नैसर्गिकरित्या गोड, मऊ आणि फायबर, लोह आणि पोटॅशियमने समृद्ध असतात. याच्यामध्ये एखाद्या गोड पदार्थाची मधुरता आहे, त्यामुळे स्मूदी किंवा एनर्जी बाइट्समध्ये याचे सेवन केले जाऊ शकते. आणू हे खजूर तुमच्या रक्तातील साखरेला रिफाइंड साखरेइतके वाढवत नाहीत.

  • 4/7

    मध: मध हा केवळ गोडच नाही तर तो अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असतो. तो चहा, दही किंवा अगदी गरम टोस्टमध्येही सुंदरपणे मिसळतो. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत मधात पोषक तत्वे आणि एंजाइम असतात जे त्याला एक पौष्टिक, नैसर्गिक पर्याय बनवतात.

  • 5/7

    नारळाची साखर: नारळाच्या पामच्या फुलांच्या रसापासून बनवलेल्या, नारळाच्या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या साखरेच्या तुलनेत कमी असतो. ही लोह, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी प्रमाणात राखते. त्याच्या कॅरॅमलसारख्या चवीमुळे, ते बेकिंग, कॉफी आणि भारतीय मिठायांमध्ये वापरण्यासाठी बेस्ट आहे.

  • 6/7

    स्टीव्हिया (Stevia) : स्टीव्हिया रेबाउडियाना वनस्पतीच्या पानांपासून तयार होते, स्टीव्हिया हे शून्य कॅलरीज असलेला नैसर्गिक गोड पदार्थ आहे. मधुमेही आणि वजन नियंत्रित करणाऱ्यांसाठी हा आदर्श पर्याय आहे. जरी हा पदार्थ साखरेपेक्षा खूपच गोड असला तरी, तो रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नाही, ज्यामुळे ते चहा, कॉफी आणि गोड पदार्थांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.

  • 7/7

    मेपल सिरप: जरी ते मूळचे भारतातील नसले तरी, शुद्ध मेपल सिरप अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज आणि झिंक सारखे ट्रेस खनिजे असतात. याच्या चवीमुळे, ते पॅनकेक्स, सॅलड ड्रेसिंग आणि बेक्ड पदार्थांमध्ये नैसर्गिक गोडवा म्हणून उत्तम प्रकारे काम करते.

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsसाखरSugar

Web Title: Sugar swaps that dont feel like sacrifices 101 747 iehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.