-
सोशल मीडियावर एक व्हायरल हॅक लोक वेगाने शेअर करीत आहेत. त्यात असा दावा आहे की, एक केळे खाऊन लगेच चार ग्लास पाणी प्यायल्याने आम्लपित्ताचा त्रास त्वरित बरी होतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
आम्लपित्त म्हणजे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाणे. त्यामुळे छातीत जळजळ, पोटफुगी किंवा तोंडात आंबट चव, अशी लक्षणे दिसतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
जास्त मसालेदार किंवा तेलकट अन्न खाणे, जेवण वगळणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा ताणतणाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. गुलनाज शेख सांगतात की, केळे नैसर्गिकरीत्या अल्कधर्मी असते आणि ते पोटासाठी सौम्य असते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
त्यामुळे पोटाच्या अस्तराला शांत करण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने आम्ल तात्पुरते पातळ होते. त्यामुळे सौम्य आम्लपित्ताच्या त्रासामध्ये काहींना आराम मिळू शकतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
मात्र, हा सर्वांसाठी जादुई उपाय नाही. काहींना एकदम जास्त पाणी प्यायल्याने पोटफुगी वाढू शकते किंवा लक्षणे अधिक बिघडू शकतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
बहुतेक लोकांसाठी केळे सुरक्षित असले तरी काहींना ते गॅसचा त्रास देणारे वाटू शकते. वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर हा उपाय अपुरा ठरतो. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
डॉ. शेख म्हणतात, “एक केळे आणि एक-दोन ग्लास पाणी योग्य आहे;पण चार मोठे ग्लास एकदम प्यायल्याने पोट ताणले जाऊ शकते आणि अस्वस्थता जाणवू शकते.” (छायाचित्र: फ्रीपिक)
-
तज्ज्ञांच्या मते, आम्लता नियंत्रित ठेवण्यासाठी वारंवार थोडे थोडे जेवण करावे, मसालेदार पदार्थ टाळावेत, दिवसभर मधून मधून पाणी प्यावे आणि समस्या वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (छायाचित्र: पेक्सेल्स)
एक केळे, चार ग्लास पाणी हा आम्लपित्तावर उपाय? व्हायरल हॅकबाबत तज्ज्ञांचे स्पष्टीकरण
आम्लपित्त नियंत्रित करण्यासाठी लोकांनी खरोखर काय करावे?
Web Title: Banana and water hack for acidity relief does it really work expert opinion and home remedies svk 05