Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. reusable water bottles place of bacteria check expert advice iehd import asc

रीयुजेबल प्लास्टिकच्या बाटल्या नव्हे बॅक्टेरियाचं केंद्र, निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचा हा सल्ला एकदा वाचा

पाण्याच्या पाटलीत आढळणारे बहुतेक जंतू हे बाटलीत तयार झालेले नसतात, तर ते बाटली वापरणाऱ्याच्या तोंडातून आलेले असतात.

August 26, 2025 16:15 IST
Follow Us
  • plastic
    1/9

    रीयुजेबल (पुन्हा वापरता येण्याजोग्या) प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्याचा आता एक ट्रेंड बनला आह. पुरेशा प्रमाणात हायड्रेशनसाठी त्या सर्वत्र वापरल्या जातात. पण जर या बाटल्या दररोज धुतल्या नाहीत तर त्या बॅक्टेरिया गोळा करू शकतात आणि बुरशी देखील निर्माण करू शकतात. यातील बहुतेक जंतू बाटलीत तयार होत नाहीत तर ते बाटली वापरणाऱ्याच्या तोंडातून आलेले असतात. प्रत्येक वेळी आपण पाणी पितो तेव्हा बॅक्टेरिया बाटलीत जातात. तसेच ओलावा बॅक्टेरिया वाढण्यास प्रोत्साहन देतो, असं ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्सचे औषध सल्लागार डॉ. अनिकेत मुळे यांनी सांगितलं. (Photo: Getty Images/Thinkstock)

  • 2/9

    काही जण ही गोष्ट नाकारतील, पण बंद, ओलसर जागेत जीवाणूंची संख्या वाढली की ते हानिकारक बनतात, असं डॉ. मुळे यांनी सांगितलं (Photo: Getty Images/Thinkstock)

  • 3/9

    डॉ. मुळे यांच्या मते, जर बुरशी श्वासावाटे शरिरात गेली किंवा आपण ती गिळली तर त्यामुळे पोटात संसर्ग होणे, घसा खवखवणे आणि अगदी बुरशीजन्य समस्या देखील उद्भवू शकतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा दीर्घकालीन आजारी असलेल्या लोकांना याचा अधिक धोका असतो. (Photo: Getty Images/Thinkstock)

  • 4/9

    स्ट्रॉ किंवा फ्लिप टॉप असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुरेशा प्रमाणात स्वच्छ करणे अधिक कठीण असते, तरी त्या स्वच्छ करण्याचे इतर मार्ग आहेत. त्यामुळे लगेच त्या फेकून देऊ नका. (Photo: Freepik)

  • 5/9

    डॉ. मुळे म्हणाले, बाटलीच्या छोट्या भेगा आणि रबर सील्समध्ये पाणी साचते व तिथे जीवाणू साठू शकतात, तेही कुणालाही न कळता. स्वच्छ दिसणाऱ्या बाटल्यांमध्येही डोळ्यांना न दिसणारी ‘बायोफिल्म’ तयार होते. ही एक चिकट थरासारखी असते, जी बाटलीच्या आतल्या भागाला चिकटून राहते. हा थर जीवाणूंना सुरक्षित ठेवतो व त्यांना साफसफाईस अधिक प्रतिरोधक बनवतो. नियमित स्वच्छता न केल्यास अशा बाटल्या वापरणाऱ्यांना वारंवार लहानसहान त्रास होऊ शकतात, जसे की पोटदुखी किंवा जुलाब होणे, शरीरात ऊर्जा कमी वाटणे किंवा घशात सतत होणारी खवखव ही त्यापैकी काही उदाहरणं आहेत. (Photo: Freepik)

  • 6/9

    परंतु, हा धोका कमी करण्यास आपण काय मदत करू शकतो? दररोज साबणाच्या पाण्याने बाटल्या स्वच्छ करा आणि पुन्हा वापरण्यापूर्वी त्या पूर्णपणे सुकू द्या. (Photo: Freepik)

  • 7/9

    स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस मर्यादा असतात. कारण त्यात बॅक्टेरियासाठी पुरेशी जागा नसते. तसेच या बाटल्या स्वच्छ करणं अधिक सोपं असतं. या बाटल्या उकळत्या पाण्यात ठेवता येतात. (Photo: Getty Images/Thinkstock)

  • 8/9

    पाण्याची बाटली कोणाबरोबरही शेअर करू नका. बाटली शेअर केल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण दुप्पट होईल, असंही मुळे यांनी सांगितलं. (Photo: Getty Images/Thinkstock)

  • 9/9

    पाण्याची बाटली जवळ बाळगणे ही आरोग्यासाठी चांगली सवय आहे, परंतु तिच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. बाटलीच्या स्वच्छतेकडे थोडेसं लक्ष दिल्यास अनेक समस्या टाळता येतील. (Photo: Getty Images/Thinkstock)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Reusable water bottles place of bacteria check expert advice iehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.