-   Ganeshotsav 2025: पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सध्या सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. 
-  अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या या श्री गणेशाचा उत्सव यावर्षी २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ०६ सप्टेंबरपर्यंत असेल. 
-  मोदकाचे सारण करण्यासाठी नारळ ताजा व पांढराशुभ्र असेल तर सारण उत्तम बनते. 
-  ताजे नारळ वापरल्यास मोदकाला येणारी चव देखील वेगळी असते. 
-  सारणासाठी गूळ खूप जास्त चिकट व कडक असू नये, नाहीतर सारण बिघडू शकते. 
-  उकडीचे मोदक करताना शक्यतो आंबेमोहोर तांदूळ वापरावा. 
-  अधिक चांगल्या चवीसाठी हळदीच्या पानांमध्ये मोदक उकडावे. 
-  मोदक पात्रात मोदक ठेवताना ते एकमेकांना चिकटणार नाही, याची काळजी घ्यावी. 
-  जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही उकडीच्या मोदकाला चमच्याने कळ्या पाडू शकता. 
-  मोदक भरताना बोटांना तूप लावा ज्यामुळे नीट मोदक भरता येईल. (सर्व फोटो सौजन्य : Unsplash) 
Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवात उकडीचे मोदक करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स
मोदकाचे सारण करण्यासाठी नारळ ताजा व पांढराशुभ्र असेल तर सारण उत्तम बनते.
Web Title: Ganesh chaturthi 2025 follow these important tips while making ukadiche modak for ganpati bappa ganeshotsav sdn