Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to control blood sugar with diet with vegetables asp

डायबिटीजसाठी वरदान ठरू शकतात ‘या’ ५ भाज्या; रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय!

Diabetes Prevention Vegetables : योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली रक्तातील साखर कमी होण्यास मदत होऊ शकते…

August 23, 2025 19:43 IST
Follow Us
  • which vegetables help control blood sugar naturally
    1/8

    चाळिशी पार केल्यावर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते आणि त्यानंतर मधुमेह, हृदयाचे विकार असे त्रास असल्याचे निदर्शनास येते. पण, आता चाळिशी नाही, तर अलीकडील तरुणांसहित लहान मुलांमध्येही हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. तुमचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेले इन्सुलिन शरीराद्वारे योग्य रीत्या वापरत नाही. त्यामुळे शेवटी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, जी तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम करू लागते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    मधुमेह हा आजार औषधे आणि जीवनशैलीतील काही बदलांमुळे कमी होऊ शकतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली रक्तातील साखर कमी होण्यास मदत होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये ही स्थिती उलटदेखील होऊ शकते. पण, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुढील काही भाज्या तुम्हाला मधुमेह रोखण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    पालक – या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज कमी आणि फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के जास्त असतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होऊ शकते. पालकमध्ये अल्फा-लिपोइक ॲसिडदेखील असते; जे तुमच्या शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    भेंडी – भेंडी फायबरचे पॉवरहाऊस आहे; ज्यात पचन आणि साखरेचे शोषण कमी करण्याची ताकद असते. त्यात मायरिसेटिनसारखी संयुगेदेखील असतात, जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    कारले – कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी नावाचे एक संयुग असते; जे इन्सुलिनसारखे कार्य करतात. त्याशिवाय त्यात चारँटिन नावाचा घटकसुद्धा असतो. या दोन्ही गोष्टी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये आणि घरगुती उपायांमध्ये कारल्याचा खूप वापर केला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    ब्रोकोली – ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोली दाहकविरोधी गुणधर्मांसाठी आणि रक्तातील साखर कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. ब्रोकोली हे मधुमेहासाठी अनुकूल असे सुपरफूड आहे. त्यात फायबरदेखील जास्त असते, जे ग्लुकोज शोषण कमी करते आणि साखरेच्या वाढीस प्रतिबंध घालतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    रताळे – नेहमीच्या बटाट्यांपेक्षा रताळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रताळे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. त्यामुळे रक्तप्रवाहात साखर हळूहळू सोडली जाते, ज्यामुळे ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध घातला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to control blood sugar with diet with vegetables asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.