-
Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.(Photo: prajakta_salve_official)
-
गृहिणींनो तुम्ही कधी डांबर गोळी गरम पाण्यात टाकली आहे का? आता तुम्ही म्हणाल डांबर गोळी आणि गरम पाण्यात कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.(Photo: prajakta_salve_official)
-
सोशल मीडियावर घरगुती उपाय सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उपाय इतके भन्नाट असतात की पाहून कोणीही थक्क होईल.(Photo: prajakta_salve_official)
-
तुमच्या घरात झुरळं आणि पाली आहेत का? जर हो, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की घरातून झुरळं किंवा पाली कशा पळवायच्या? पण टेन्शन घेऊ नका. एका डांबर गोळीच्या मदतीने तुम्ही घरातील पाली किंवा झुरळं पळवू शकता(Photo: prajakta_salve_official)
-
एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हे पाणी गरम करा.त्यानंतर त्यात एक डांबरगोळी टाका आणि त्याचबरोबर एक कापूरची वडी सुद्धा या गरम पाण्यात टाका.जोपर्यंत ही डांबर गोळी पाण्यात विरघळत नाही, तोपर्यंत गॅस सुरू ठेवा.(Photo: prajakta_salve_official)
-
एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हे पाणी गरम करा.त्यानंतर त्यात एक डांबरगोळी टाका आणि त्याचबरोबर एक कापूरची वडी सुद्धा या गरम पाण्यात टाका.जोपर्यंत ही डांबर गोळी पाण्यात विरघळत नाही, तोपर्यंत गॅस सुरू ठेवा.(Photo: prajakta_salve_official)
-
गरम पाण्यात ही डांबरगोळी विरघळताना दिसते व पाण्याच्या वरती एक थर जमा होतोडांबरगोळी विरघळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी कोमट होण्यापूर्वी हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. (Photo: prajakta_salve_official)
-
त्यानंतर त्यात तीन ते चार चमचे तुम्ही जे वापरता ते लिक्विड फ्लोअर टाका आणि हा स्प्रे जिथे पाल येत असतील किंवा झुरळ दिसतील तिथे मारा.(Photo: prajakta_salve_official)
-
१५ दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.फक्त स्प्रे मारताना स्वच्छता ठेवा.त्यामुळे इथून पुढे तुम्हाला केमीकल उत्पादनं घेऊन पैसे वाया घालवायची गरज नाही.(Photo: prajakta_salve_official)
महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
Kitchen jugad: महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
Web Title: Kitchen jugaad as naphthalene ball was put in hot water jugaad a woman told a unique trick srk