Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. protect your kidney health six skin changes that could be early warning signs of kidney disease pdb

किडनी खराब व्हायला सुरूवात झाल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ धोक्याची चिन्हे; आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर…

Kidney Disease Early Signs: किडनी आजाराची सुरुवात कळते त्वचेवरून! ही ६ चिन्हे ओळखलीत का?

September 8, 2025 09:45 IST
Follow Us
  • किडनीच्या आजाराला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं, कारण हा आजार इतक्या शांतपणे शरीरात घर करतो की बराच काळ आपल्याला कळतही नाही.
    1/12

    किडनीच्या आजाराला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं, कारण हा आजार इतक्या शांतपणे शरीरात घर करतो की बराच काळ आपल्याला कळतही नाही.

  • 2/12

    सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दिसत नसली तरी जसजशी समस्या वाढते, तसतसे तिचे काही इशारे थेट त्वचेवर दिसू लागतात.

  • 3/12

    ही लक्षणं फक्त वरवरचे त्रास नसून किडनीच्या गंभीर बिघाडाचे संकेत असतात.

  • 4/12

    शरीरात शांतपणे सुरू असलेला घातक खेळ तुम्ही ओळखलाच नाही तर? किडनीच्या आजाराचा इशारा तुमच्या त्वचेवर आधीच उमटला असेल, पण आपण तो दुर्लक्षित करत असाल. ‘हे’ सहा सूक्ष्म बदल तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतात…

  • 5/12

    वेळेत ओळखलंत तरच संकट टळेल. मणिपाल हॉस्पिटल, बेंगळुरूचे यूरोलॉजिस्ट डॉ. दीपक दुबे यांच्या मते, योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि निरोगी जीवनशैली अवलंबल्यास किडनी सुरक्षित राहू शकते.

  • 6/12

    किडनीने नीट कार्य न केल्यास त्वचा अतिशय कोरडी, खडबडीत आणि घट्ट होते. कधी कधी ती माशांच्या खव्यासारखी पापुद्र्यांनी भरलेली दिसते. ही अवस्था प्रामुख्याने डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या रुग्णांमध्ये आढळते.

  • 7/12

    किडनीच्या त्रासामुळे होणारी खाज काही क्षणांची नसते; ती दिवस-रात्र सतावत राहते, ज्यामुळे झोपमोड होते आणि जीवनशैली बिघडते. उपचारांनी आराम न मिळाल्यास UVB लाईट फोटोथेरपी उपयोगी पडते.

  • 8/12

    सततच्या खाजेमुळे त्वचेवर खरचटल्याचे निशाण, पुटकुळ्या, जाडसर त्वचेचे भाग आणि खाजरे गाठी दिसू लागतात.

  • 9/12

    टॉक्सिन्स जमा झाल्याने त्वचेचा रंग पिवळसर, फिका, राखाडी किंवा तपकिरी होऊ शकतो. सतत खाजवल्यामुळे त्वचा जाड, कठीण व जखमेप्रमाणे होऊ शकते. यामुळे संसर्गाचाही धोका वाढतो.

  • 10/12

    किडनी अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकू शकत नसल्यास पाय, टाच, हात, चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज येते. त्वचा ताणलेली व चमकदार दिसते, पायात बूट किंवा बोटात अंगठी घालणं कठीण होतं.

  • 11/12

    किडनीच्या अंतिम टप्प्यात त्वचेवर लहान, खाजरे, पापुद्र्यासारखे दाणेदार पुरळ दिसतात. ते मोठ्या, खडबडीत डागांमध्ये बदलतात आणि पुन्हा पुन्हा उद्भवतात.

  • 12/12

    हे संकेत दिसताच त्याकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. ही लक्षणे दिसली तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या… (फोटो सौजन्य : Freepik \ लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Protect your kidney health six skin changes that could be early warning signs of kidney disease pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.