-
निरोगी राहण्यासाठी आहारात भाज्या महत्त्वाच्या असतात. पण, अनेक जण भाज्या खोल तळून खातात. असे केल्याने त्या भाज्यांतील पोषक घटक नष्ट होतात आणि त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. काही भाज्या तर तळल्यावर तेल शोषून घेऊन कॅलरी बॉम्बमध्ये बदलतात. पाहूया कोणत्या भाज्या तळणे टाळावे.
-
वांगी
वांग्याला ‘तेल शोषणारी भाजी’ म्हटले जाते. खोल तळल्यावर ही भाजी भरपूर तेल पिते. नैसर्गिकरीत्या कमी कॅलरी असलेले वांगे तळल्यावर स्निग्ध आणि आरोग्यास हानिकारक ठरते. -
फुलकोबी
फुलकोबी पौष्टिकतेने समृद्ध असते, पण तळल्यावर त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे कमी होतात. अशा वेळी पौष्टिक भाजी जड नाश्ता बनते. -
भेंडी
भेंडीतील फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र, तळलेली भेंडी हा गुण गमावते. शिवाय जास्त पिठाचा लेप आणि तेलामुळे ती जड होते. -
कांदे
कांद्याचे पकोडे खायला आवडतात, पण खोल तळल्यावर कांद्याची नैसर्गिक साखर कॅरॅमलाइज होते आणि त्यात तेलही जास्त प्रमाणात टिकते, त्यामुळे हे पकोडे कॅलरीने भरलेले असतात. -
बटाटे
बटाटे तळल्यावर ते चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज बनतात. यात कॅलरी जास्त असते आणि अॅक्रिलामाइडसारखे हानिकारक घटक तयार होतात, त्यामुळे वजन वाढण्याचा आणि हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. -
पालक
पालक लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो. पण, गरम तेलात टाकताच तो लगेच कोमेजतो आणि त्यातील पोषक घटक नष्ट होतात. तेल मात्र शोषले जाते.
‘या’ भाज्या तळून खाणे टाळा; पोषणमूल्य नष्ट होऊन शरीरावर होतात विपरीत परिणाम
Deep fry vegetables: तळलेल्या भाज्या टाळा! पोषक भाज्या होतात ‘कॅलरी बॉम्ब’
Web Title: Avoid frying these vegetables nutrients destroyed harmful effects health tips svk 05