• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. potential health risks of vegetarian diets know detail information kvg

फक्त शाकाहारी आहारावर अवलंबून आहात? मग त्याचे संभाव्य धोकेही लक्षात घ्या…

शाकाहारी आहाराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, परंतु काळजीपूर्वक नियोजन न केल्यास ते त्याचे काही धोकेदेखील आहेत. याबद्दल जाणून घेऊ.

Updated: September 17, 2025 20:34 IST
Follow Us
  • veggies, health
    1/7

    कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे यासारखे असंख्य फायदे शाकाहारी आहारामुळे होतात. मात्र काळजीपूर्वक नियोजन न केल्यास त्याचे काही तोटेही आपल्याला भोगावे लागू शकतात. संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहिल्यास शाकाहार करणाऱ्या लोकांना अधिक संतुलित आणि पौष्टिक आहार राखण्यास मदत होऊ शकते. (Source: Photo by Unsplash)

  • 2/7

    व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता: व्हिटॅमिन बी १२ हे प्रामुख्याने प्राण्यांशी निगडित खाद्यात आढळते. शाकाहारी लोकांना या जीवसत्वाच्या कमतरतेचा धोका असतो. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि अगदी मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फोर्टिफाइड अन्न किंवा पूरक आहार अनेकदा आवश्यक असतो. (Source: Photo by Unsplash)

  • 3/7

    लोहाची कमतरता: वनस्पतींपासून मिळणारे लोह मांसाहारी लोहाच्या तुलनेत शरीरात कमी शोषले जाते. मसूर, पालक किंवा फोर्टिफाइड तृणधान्ये यांसारख्या लोहयुक्त पदार्थांनी लोहाची पातळी नियंत्रणात न आणल्यास अशक्तपणाचा, फिकट त्वचा आणि चक्कर येणे यांचा धोका वाढतो. (Source: Photo by Unsplash)

  • 4/7

    ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडची कमतरता: शाकाहारी लोकांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडची कमतरता भासू शकते, विशेषतः डीएचए आणि ईपीए, जे मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे प्रामुख्याने फॅटी माशांमध्ये आढळत असल्याने, शाकाहारी लोकांना जवस, चिया बियाणे, अक्रोड यासारख्या पूरक आहारांवर अवलंबून राहावे लागते. (Source: Photo by Unsplash)

  • 5/7

    प्रथिनांच्या कमतरतेचा धोका: जरी अनेक वनस्पती स्रोत प्रथिने प्रदान करतात, तरी विविधतेच्या अभावामुळे आवश्यक अमीनो आम्लांचे सेवन अपुरे होऊ शकते. बीन्स, मसूर, क्विनोआ किंवा सोया यांचा समावेश न करता भात किंवा ब्रेडवर जास्त अवलंबून राहिल्याने प्रथिनांची कमतरता निर्माण होऊ शकते. (Source: Photo by Unsplash)

  • 6/7

    हाडांच्या आरोग्याची चिंता: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे कमी सेवन हाडे कमकुवत होण्याचा आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढवू शकते. विशेषतः जे शाकाहारी दुग्धजन्य पदार्थ घेत नाहीत, त्यांनी हाडांच्या बळकटीसाठी फोर्टिफाइड वनस्पतींचे दूध, पालेभाज्या किंवा पूरक आहार घ्यावा. (Source: Photo by Unsplash)

  • 7/7

    प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर जास्त अवलंबून राहण्याचा धोका: काही शाकाहारी लोक मांसाऐवजी उच्च प्रक्रिया केलेले “मॉक मीट” किंवा रिफाइंड कार्ब्स वापरू शकतात, मात्र याने सोडियमची पातळी वाढू शकते. त्यातून हृदयाच्या आरोग्याला हानी आणि वजन वाढू शकते. प्रक्रिया केलेल्या पर्यायांपेक्षा संपूर्ण अन्नावर आधारित शाकाहारी आहार आरोग्यदायी असतो. (Source: Photo by Unsplash)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Potential health risks of vegetarian diets know detail information kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.