-
Tips To Reduce Kids Screen Time: आजची पिढी इंटरनेट, स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया या तीन डिजिटल डाएटवरच मोठी होत आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
‘स्क्रीन टाइम’ म्हणजे फोन, लॅपटॉप, टॅब, टीव्ही यांच्या मदतीने घालवलेला एकूण वेळ.
-
स्मार्ट फोन वापराबद्दलचे नियम फक्त मुलांपुरतेच मर्यादित नकोत. तर पालकांनी स्वतःही ते नियम पाळावेत.
-
स्क्रीन टाइम व्यतिरिक्त उरलेला वेळ छंदासाठी दिला तरी तो आनंद देणारा असतो, याची जाणीव मुलांना करून द्या.
-
आपण फोन वापरतो तो कामासाठी आणि मुलं मात्र टाइमपास म्हणून वापरतात, ही मानसिकता बदलायला हवी.
-
कामाव्यतिरिक्त आपण स्वतः सोशल मीडियावर किती वेळ अॅक्टिव्ह असतो, याचा आधी पालकांनी विचार करावा.
-
या आधुनिक तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मित्र कसं मानता येईल? त्यासाठी स्मार्ट फोनचा ‘स्मार्ट’ बनून कसा उपयोग करून घ्यायचा, याचं पालकांनी मुलांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.
-
स्मार्ट फोनचा वापर नेमका कसा करायचा? याची कल्पना पालकांनी मुलांना दिली पाहिजे.
-
घरात ‘नो स्क्रीन झोन’ तयार करता येतील. म्हणजे अशा काही जागा जिथे कोणीही फोन वापरणार नाही. उदा. जेवायला बसताना, गप्पा मारताना, बाथरूममध्ये. किंवा दिवसातलं किमान एका जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन, गप्पा मारत पूर्ण करायचं असा नियम करता येईल. (हेही पाहा : फॅटी लिव्हरचा त्रास होतोय? मग आजपासून खा ‘ही’ फळे)
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स
स्क्रीन टाइम व्यतिरिक्त उरलेला वेळ छंदासाठी दिला तरी तो आनंद देणारा असतो, याची जाणीव मुलांना करून द्या.
Web Title: Parents must follow these important tips for reduce kids screen time smart phone social media sdn