• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. fridge storage mistakes vegetables that harm health and right ways to store them svk

फ्रिजमध्ये ‘या’ भाज्या ठेवल्यामुळे होऊ शकतात आरोग्यावर विपरीत परिणाम; जाणून घ्या भाज्या साठवण्याच्या योग्य टिप्स

आजकालच्या जगात सगळ्यांच्या घरात फ्रिज वापरला जातो. फळांपासून अन्नपदार्थांपर्यत आपण सगळं काही फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही भाज्या अशा आहेत की, ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Updated: September 17, 2025 13:17 IST
Follow Us
  • fridge storage mistakes vegetables
    1/10

    बाजारातून लोक अनेकदा भरपूर भाज्या आणि फळे विकत घेऊन फ्रिजमध्ये ठेवतात, जेणेकरून त्या जास्त काळ ताज्या राहतील. हा मार्ग योग्य असला तरी काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास, त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 2/10

    खरं तर थंड तापमान आणि आर्द्रतेमुळे काही भाज्या लवकर सडतात आणि त्यामुळे फूड पॉयजनिंगचा धोका वाढू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत आणि त्यांना योग्य पद्धतीने कशा स्टोअर कराव्यात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 3/10

    काकडी (Cucumber)
    काकडी लोक नेहमी फ्रिजमध्ये ठेवतात; पण १० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात काकडी पटकन खराब होऊ लागते. फ्रिजमध्ये ठेवल्यास ती पिवळी पडते आणि चव बिघडते. काकडी नेहमी खोलीच्या सामान्य तपमानावर ठेवावी आणि टोमॅटो, खरबुज, अॅवोकॅडो यांच्याजवळ ठेवू नये. कारण- हे पदार्थ एथिलिन वायू सोडतात ज्यामुळे काकडी लवकर खराब होते. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 4/10

    टोमॅटो (Tomato)
    टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवले की, त्याची चव आणि सुगंध कमी होतो. थंड तापमानामुळे त्याची रचना बदलते. टोमॅटो नेहमी थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावा, जिथे थेट सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. खोलीच्या तापमानावर ठेवलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवलेल्या टोमॅटोपेक्षा जास्त दिवस ताजे राहतात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 5/10

    कांदा (Onion)
    कांदा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. आर्द्रतेमुळे फ्रिजमध्ये कांदा पटकन खराब होतो आणि त्याला बुरशी लागू शकते. कांदा नेहमी कोरड्या, थंड व हवेशीर जागी ठेवावा. योग्य पद्धतीने ठेवला, तर कांदा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ खराब होत नाही. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 6/10

    बटाटा (Potato)
    कच्चा बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास, त्यातील स्टार्च साखरेत बदलतो. त्यामुळे बटाट्याची चव गोडसर लागते आणि शिजवल्यानंतर त्याचं टेक्श्चर खराब होतं. बटाटे नेहमी टोपलीत किंवा पेपर बॅगमध्ये ठेवावेत आणि ती जागा थंड व अंधाऱ्या ठिकाणी असावी. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 7/10

    लसूण (Garlic)
    लसूण फ्रिजमध्ये ठेवला की, तो पटकन आर्द्रता शोषून घेतो आणि रबरासारखा होतो. तो नेहमी कांद्याप्रमाणेच थंड व हवेशीर ठिकाणी ठेवावा. तसेच लसूण प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवू नये. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 8/10

    अॅव्होकॅडो (Avocado)
    अॅव्होकॅडो फ्रिजमध्ये ठेवला की, तो हळूहळू पिकतो आणि जास्त काळ ताजा राहत नाही. तो नेहमी खोलीच्या तापमानावर ठेवावा. त्यामुळे तो नैसर्गिकरीत्या पिकतो आणि खाण्यात अधिक चविष्ट लागतो. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 9/10

    ढोबळी मिरची (Bell Peppers)
    ढोबळी मिरची फ्रिजमध्ये ठेवली की, तिचा क्रंची टेक्श्चर निघून जातो. ती खोलीच्या तापमानावर ठेवली की, कुरकुरीतपणा आणि चव बराच काळ टिकून राहते. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 10/10

    भाज्या कशा कराल योग्य पद्धतीने स्टोअर?
    भाज्या नेहमी वेगळ्या श्रेणीत ठेवाव्यात. बटाटा आणि कांदा कधीही एकत्र ठेवू नयेत. कारण- बटाट्यातून निघणारा वायू कांद्याला पटकन अंकुरित करतो. भाज्या आणि फळे प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवू नयेत. त्यामुळे त्याच्या आत आर्द्रता अडकते आणि ती फळे वा भाज्या लवकर खराब होतात. फ्रिजमध्ये ठेवायच्या भाज्या स्वच्छ करून, कोरड्या करूनच स्टोअर कराव्यात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Fridge storage mistakes vegetables that harm health and right ways to store them svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.