-
Gokarna Flower Health Benefits: गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे.
-
फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले असावे.
-
गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते.
-
गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो.
-
निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो.
-
गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो.
-
गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.
-
सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे.
-
रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो.
-
(हेही पाहा : महिनाभर रोज रताळे खाल्ल्याने शरीरात होतील ‘हे’ बदल)
फूल एक फायदे अनेक; गोकर्णाच्या फुलांमध्ये असतात ‘हे’ औषधी गुणधर्म, बघा कसा करायचा उपयोग
गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते.
Web Title: Health benefits of consuming gokarna flower and leaves traditional medicine butterfly pea sdn