-
तुम्हाला जिममध्ये जायला जमत नसेल किंवा जिथे राहाता तिथे जिम नसेल पण व्यायाम करायची इच्छा असेल तर कमी जागेतही व्यायाम करता येतात. ते करुनही तुम्ही फिट राहू शकता. जाणून घेऊ अशाच काही व्यायामांबाबत
-
सरळ उभे राहा, एक गुडघा वर उचला खाली टेका, त्यानंतर दुसरा उचला खाली टेका असं तुम्हाला जमेल तेवढ्या वेगाने करा. ज्यामुळे हृदय अधिक कार्यक्षम होतं. शिवाय या व्यायामाला फार जागा लागत नाही.
-
दुसरा व्यायाम प्रकारही सोपा आहे. पुढचा गुडघा खाली टेका आणि अशा पद्धतीने उभे राहा. त्यानंतर दुसरा गुडघा टेका आणि असाच व्यायाम करा. यामुळे पायांचा उत्तम व्यायाम होतो.
-
दोन्ही हात पुढे टेका आणि पाय लांब करा. त्यानंतर गुडघे एक एक करुन पोटाजवळ घ्या आणि मागे न्या. फोटोत दाखवल्याप्रमाणे व्यायाम करा. शक्य असल्यास वेग वाढवा. हा व्यायाम करायलाही फार जागा लागत नाही.
-
प्लँक हा सर्वांगासाठी सुंदर व्यायाम आहे. यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येतं. शिवाय तुम्हाला तुमची शारिरीक क्षमताही वाढवता येते आणि हो जागा फार लागत नाहीच.
-
पुश अप हा देखील छाती, खांदे आणि हातांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने पुश अप जमत नसतील तर गुडघ्यावर बसून पुश अप करण्याचा प्रयत्न करा. त्यानेही बराच फायदा होतो.
-
बैठका किंवा स्क्वॉट्स हा व्यायामही कमी जागेत करता येतो. तुमची पाठ सरळ ठेवून हा व्यायाम तुम्हाला फोटोत दाखवल्याप्रमाणे करता येईल. हा व्यायाम कंबर, मांड्या आणि पाय यांच्यासाठी सर्वोत्तम आहे.
अगदी थोड्या जागेतही करता येतील असे खास व्यायाम प्रकार कुठले? राहा फिट आणि दिसा मस्त!
तुम्हाला व्यायाम करायचा आहे पण जिम लावणं शक्य नाही? घरातली जागा पुरत नाही? हे खास व्यायाम पाहाच.
Web Title: Best bodyweight exercises for small spaces iehd import know about it scj