-
रात्रीचा आहार कायम हलका असावा असं म्हटलं जातं. रात्रीच्या आहारासाठी जगातल्या विविध देशांमध्ये काय पर्याय असतात चला जाणून घेऊ.
-
फ्रान्समध्ये झुकिनी नावाचा एक पदार्थ रात्रीचा आहार म्हणून सेवन केला जातो. झुकिनी वांगं आणि टॉमेटोपासून बनवतात. ब्रेडसह झुकिनी खाणं पसंत केलं जातं.
-
इटलीत स्पेगेटी बोलोग्नीज डिनरला बनवण्याची पद्धत आहे. ही एक पास्ता डिश आहे. परिपूर्ण आहार म्हणून रात्रीच्या जेवणात याचा समावेश होतो.
-
जपानमध्ये रात्रीच्या जेवणाचा पर्याय म्हणून सुशी प्लॅटर खाल्लं जातं. यात भाज्यांचे रोल आणि सोया सॉसचा समावेश असतो.
-
मेक्सिकोमध्ये रात्रीच्या जेवणात टाकोजचं सेवन केलं जातं. ते भाज्या, साल्सा आणि ग्वाकामोलने भरलेले असतात
-
थायलंड- जास्मिन राईससह हिरवी करी: भाज्या, चिकन किंवा टोफूसह बनवलेली एक चवदार नारळाची करी जी सुगंधित भातासोबत दिली जाते.
-
मसूर डाळ किंवा मूग डाळीचं वरण आणि वाफाळलेला भात हे भारतीय डिनर कॉम्बो आहे. गरम भात, वरण आणि लोणचं म्हटलं तर बात ही बन गयी.
रात्रीच्या जेवणात जगातल्या विविध देशात काय पर्याय स्वीकारतात लोक? जाणून घ्या या खास डिश
रात्रीचं जेवणात विविध पदार्थ कुठल्या देशांमध्ये कसे सेवन केले जातात चला जाणून घेऊ.
Web Title: Dinner options from around the world iehd import know about the options scj