-

हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून १ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल,
-
नवरात्रीच्या काळात देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी लोक विविध स्तोत्र, मंत्राचे पठण करतात परंतु यासह तुम्ही तुमच्या राशीनुसार शुभ असलेल्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केल्यास देवीची आई तुमच्यावर प्रसन्न होईल. -
मेष आणि वृश्चिक राशीसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे नवरात्रीत तुम्ही या रंगाचा वापर करा. हा रंग तुमचे भाग्य उजळण्यास मदत करेल.
-
वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी गुलाबी, पांढरा रंगाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही सुखमय होईल.
-
मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीच्या काळात हिरव्या, पोपटी, मोरपंखी अशा रंगांचा वापर करायला हवा. या रंग तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येईल.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरा, सिलव्हर आणि हलके रंग शुभ असतील. हे रंग तुमच्या आयुष्यात मानसिक शांतता घेऊन येतील.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नारंगी, गोल्डन हे रंग खूप फायदेशीर असतील. हा रंग तुमचे नशीब चमकवण्यास कारणीभूत ठरू शकतो.
-
धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग अत्यंत शुभ ठरेल. हा रंग तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात अधिक यश मिळवून देईल तसेच तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल होतील.
-
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, जांभळा आणि राखाडी रंग अधिक फायदेशीर ठरेल. हा रंग नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे संरक्षण करेल.
नवरात्रीच्या दिवसात भगवतीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी राशीनुसार ‘या’ रंगाचा करा जास्तीत जास्त वापर
Shardiya Navratri 2025 dress color by zodiac: नवरात्रीच्या काळात देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी लोक विविध स्तोत्र, मंत्राचे पठण करतात परंतु यासह तुम्ही तुमच्या राशीनुसार शुभ असलेल्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केल्यास देवीची आई तुमच्यावर प्रसन्न होईल.
Web Title: To receive the special grace of goddess during navratriuse this color as per your zodiac sign sap