-
तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यासाठी तुमचा नाश्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी हलकेफुलके किंवा आवडीचे नाही, तर योग्य अन्न खाल्ले पाहिजे. तर मधुमेह असलेल्यांसाठी सगळ्यात उत्तम नाश्ता म्हणजे नाचणी आणि ओट्स. तसे बघायला गेले, तर नाचणी आणि ओट्स हे दोन्ही पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, त्यापैकी काय निवडायचे आणि कशा पद्धतीने बनवायचे ते संपूर्णपणे तुमच्या आरोग्याच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते, असे आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल न्यूट्रिशन व डायटेटिक्स विभागाच्या टीम लीडर डॉक्टर अंशुल सिंग यांनी स्पष्ट केले. आज आपण नाचणी आणि ओट्स यापैकी काय उत्तम ठरेल याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नाचणी – बऱ्याच काळापासून भारतीय स्वयंपाकघरांमध्ये प्रमुख पदार्थ म्हणून वापरला जातो. त्यामध्ये नैसर्गिकरीत्या लोह, कॅल्शियम व फायबर भरपूर प्रमाणात असतात. रागीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच तो रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवत नाही. त्यातील फायबरचे प्रमाण क्रेव्हिंग दूर करून, मन तृप्त होण्यास मदत करतात आणि पचनदेखील सुधारतात, असे डॉक्टर अंशुल सिंग यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नाचणीमधील पॉलीफेनॉल्स रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करणारी नैसर्गिक वनस्पती संयुगे असतात. पण, नाचणीचा वापर तुम्ही आहारात कसा करता या गोष्टीचा खूप मोठा फरक तुमच्या शरीरावर पडू शकतो. उदाहरणार्थ- तळलेले नाचणीचे स्नॅक्सऐवजी तुम्ही आंबवलेला नाचणीचा डोसा, नाचणीचे पीठ घालून केलेली पेज किंवा नाचणीच्या पेयाचे सेवन करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik
-
ओट्स – ओट्स हृदयाच्या आरोग्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बीटा-ग्लुकन हे विरघळणारे फायबर असल्याने शरीरातील ग्लुकोज शोषण कमी करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यात मदत करतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी ओट्स उत्तम आहेत. कारण- त्यामुळे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होत नाही, तर कोलेस्ट्रॉलही कमी राहते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे ओट्सचा फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, इन्स्टंट किंवा फ्लेवर्ड ओट्स जास्त खाऊ नका. कारण- यामध्ये लपलेली साखर आणि रसायने असतात. त्यामुळे रोल ओट्स किंवा स्टील कट ओट्स खाऊ शकता आणि त्यांचा पेज, स्मूदी किंवा अगदी चवदार भाज्यांच्या उपमामध्येही वापर करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
… तर ओट्स चांगले की नाचणी?
-
जर तुम्हाला पारंपरिक, कॅल्शियमयुक्त पदार्थ हवे असतील, तर नाचणीचा पर्याय उत्तम आहे. पण, जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत असाल, तर ओट्स हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे उत्तम पर्यायासाठी वेगवेगळी पोषक तत्त्वे मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या दोन्हींचा समावेश करणे गरजेचे आहे, असे डॉक्टर अंशुल सिंग यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
ओट्स की नाचणी; काय खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित? वाचा, डॉक्टरांचा सल्ला…
Best Diabetic Breakfast : आज आपण नाचणी आणि ओट्स यापैकी काय उत्तम ठरेल याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…
Web Title: If you have diabetes what should you eat oats or ragi for breakfast asp