-
सकाळी फळांचा रस पिण्याचा साखरेवर परिणाम सकाळी रिकाम्या पोटी फळांचा रस घेतल्यास शरीरात साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे थोड्याच वेळात अस्वस्थता, चिडचिडेपणा येऊन, शरीराला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
आम्लपित्त व दाहकतेचा धोका फळाच्या रसातील नैसर्गिक आम्ल रिकाम्या पोटी घेतल्यास पचनसंस्थेमध्ये दाह निर्माण होतो. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ व उलट्या यांसारखे त्रास होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, ही सवय दीर्घकाळ राहिली, तर गॅस्ट्रिक विकार वाढू शकतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता फळांच्या रसात असलेली साखर व आम्ल दातांच्या इनॅमलला हानी पोहोचवतात. रिकाम्या पोटी रस प्यायल्याने त्याचा दातांवर थेट परिणाम होतो आणि दात कुरतडणे, पिवळसरपणा किंवा कीड होण्याचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
फायबरचा अभाव आणि पोट लवकर रिकामे होणे फळ खाल्ल्यास त्यातील फायबरचे पचन व्हायला वेळ लागतो; पण रसामध्ये ते नसल्यामुळे तो पटकन पचतो. त्यामुळे भूक पटकन लागते आणि ओव्हरइटिंग होण्याची शक्यता वाढते. परिणामी वजन वाढण्याचाही धोका संभवतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
पोषक तत्त्वांची हानी रस काढताना फळातील बरेचसे फायबर आणि काही जीवनसत्त्वे कमी होतात. त्यामुळे फळाच्या तुलनेत रसामध्ये पोषणमूल्य कमी राहते. म्हणून तज्ज्ञ नेहमी संपूर्ण फळ खाण्याचा सल्ला देतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोका ज्यांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे आहे, त्यांनी फळांचा रस टाळणे गरजेचे आहे. कारण- त्यात नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असल्याने टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. रोजच्या या घातक सवयीमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
ऊर्जा कमी होणे रस प्यायल्यानंतर लगेच ऊर्जा जाणवते. पण, थोड्याच वेळात रक्तातील साखरेत घट होते आणि थकवा, कमजोरी जाणवते. त्यामुळे दिवसभरातील कामगिरीवर विपरीत परिणाम होतो आणि मन एकाग्र राहत नाही. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
पचनासंबंधीच्या अडचणी रिकाम्या पोटी रस घेतल्यामुळे पचनक्रिया बिघडते. काहींना पोट फुगणे, अस्वस्थता किंवा जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे रस योग्य वेळेला आणि मोजक्या प्रमाणात घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
रस पिण्याची योग्य वेळ आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रस जेवणानंतर किंवा नाश्त्यासोबत घेतल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होतात. अशा वेळी रस शरीरात सहज पचतो आणि रक्तशर्करेची झपाट्याने वाढ होत नाही. त्यामुळे दिवसाची सुरुवात रसाऐवजी हलक्या व संतुलित आहाराने करणे योग्य ठरते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
सकाळी फळांचा रस पिता? रिकाम्या पोटी रस प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
रिकाम्या पोटी फळांचा रस आरोग्यासाठी घातक; रक्तशर्करेत वाढ, अॅसिडिटी, दातांचे नुकसान आणि मधुमेहाचा धोका
Web Title: Why you should never drink fruit juice on empty stomach health risks svk 05