-
Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
-
डाळिंब्याच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
-
डाळिंब्याच्या सालीचा चहा किंवा पावडर नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर (Blood Sugar) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
जुलाब किंवा पोटात जंत झाल्यास डाळिंब्याच्या सालीचा काढा पिणे फायदेशीर ठरू शकते.
-
डाळिंब्याच्या सालीचा काढा किंवा पावडर मधामध्ये मिसळून घेतल्यास घसा खवखवणे, घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
-
डाळिंब्याच्या सालीचा अर्क तोंडातील दुर्गंधी (Bad Breath) कमी करते.
-
डाळिंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) मोठ्या प्रमाणात असतात.
-
हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला यूव्ही किरणांपासून (UV Rays) होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
-
सालीची पावडर चेहऱ्यावर लावल्यास डेडस्किन, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
-
डाळिंब्याची साल उन्हात वाळवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. ही पावडर हवाबंद डब्यात साठवून ठेवली जाऊ शकते आणि गरजेनुसार वापरली जाऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डाळिंब खाऊन सालं फेकून देत असाल तर थांबा! ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून थक्क व्हाल
डाळिंब्याच्या सालीचा चहा किंवा पावडर नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
Web Title: Health benefits of eating pomegranate peel for immunity blood sugar high blood pressure sdn